अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ या मालिकेतून अभिनेत्रीने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. ‘बिग बॉस मराठी’ व टेलिव्हिजन मालिकांमधून मिळालेल्या यशानंतर ती हळुहळू चित्रपटांकडे वळली. वैयक्तिक आयुष्यात शिवानी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेता अजिंक्य ननावरेला डेट करत आहे.

अजिंक्य व शिवानीची जोडी मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र असलेली ही जोडी लग्न केव्हा करणार याबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसतात. आता अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका नव्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा अजिंक्य-शिवानीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा : आली समीप लग्नघटिका! मुग्धाला लागली प्रथमेशच्या नावाची हळद, लग्नघरातील फोटो आले समोर

अभिनेत्री या व्हिडीओमध्ये साडी खरेदी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच्या कॅप्शनमध्ये शिवानीने “या आठवड्यात माझ्या आईला मी हा व्हिडीओ पाठवला. २०२४ मध्ये काहीतरी खास…” असं लिहिलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “तुम्ही दोघं लग्न करणार आहात का?”, “तुमचं लग्न आहे का?” अशा कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे सध्या शिवानी-अजिंक्यच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा : उपेंद्र लिमयेंच्या लेकाने रणबीर कपूरसाठी दिलेला खास निरोप; म्हणाले, “अ‍ॅनिमलच्या सेटवर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरेची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं. २०१७ पासून शिवानी-अजिंक्य एकत्र असून लवकरच लवकरच लग्न करणार आहेत.