Prarthana Behere Father Death: मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रार्थनाच्या वडिलांचं अपघाती निधन झालं आहे. तिने स्वतः वडिलांच्या निधनाबद्दल पोस्ट करून माहिती दिली आहे. तिने वडिलांसाठी एक भावुक पोस्ट केली आहे. तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खुप दुखावलो आहोत, असं प्रार्थना बेहेरेने म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी प्रार्थना बेहेरेची जवळची मैत्री प्रिया मराठे हिचं कॅन्सरमुळे निधन झालं. त्यानंतर आता तिने वडिलांना गमावलं आहे. प्रार्थनाच्या वडिलांचं १४ ऑक्टोबर रोजी रस्ते अपघातात निधन झालं. प्रार्थनाने वडिलांचा एक फोटो शेअर करून इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली.
“मर के भी किसी को याद आएंगे
किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे
कहेगा फूल हर कली से बार बार
जीना इसी का नाम है “
माझे बाबा …. ❤️
१४ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन दुर्दैवाने एका रस्ते अपघातात झाले”
बाबा……. तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय,
तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजतं, तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो, आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे, तर दृष्टिकोन असतो.
तुमचा प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि लोकांप्रती असलेलं निस्सीम प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं.
तुम्ही आम्हाला शिकवलंत की इतरांना मदत करणे हेच खरं समाधान आहे.
आज तुम्ही आमच्यासोबत नसला तरी तुमचा आवाज आणि गाणी आम्हाला सतत बळ देतात.
तुमची अचानक झालेली exit, मनाला भयंकर लागली आहे. काल परवापर्यंत सगळ आलबेल होतं. तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खुप दुखावलो आहोत. प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच रहाणार आहे.
पण या सगळ्या घटनेला वेगळ्या दृष्टीने पाहीलं तर, तुम्ही अधिक प्रत्येकाच्या जवळ रहाणार आहात. कारण तुम्ही स्मरणात राहणार. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी, आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा, तुमच्याशी संवाद साधू शकतोय.
तुम्हाला आजपर्यंत अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी करत आली आहे. आता अधिक जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला माझ्या अप्रतिम कामाने श्रध्दांजली अर्पण करत रहाणं, हे माझं कर्तव्य आहे.
डोळ्यातलं पाणी कधीच तुम्हाला दिसू नये याची काळजी घेईन. कारण मलाही तुम्हाला धूसर पहायचं नाही. तुमचं ओठावरचं हसू, मनात घर करून राहीलं आहे. तेच टिकवण्याची जबाबदारी मी घेणार आहे.
काळजी करू नका… मी खूप strong आहे. कारण माझ्या पाठीशी नाही तर, तुम्ही सोबत आहात याची खात्री आहे.
I LOVE YOU BABA , MISS YOU FOREVER
तुमची Tumpa, असं प्रार्थना बेहेरेने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
काही महिन्यांपूर्वीच प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचा ७५ वा वाढदिवस झाला होता. दरम्यान, प्रार्थना बेहेरेची ही पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. केदार शिंदे, मयुरी देशमुख, सुबोध भावे, अमृता खानविलकर, वैभव तत्ववादी, पुष्कर जोग यांनी कमेंट्स करून प्रार्थनाला धीर दिला. तसेच प्रार्थनाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
