सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. येत्या २ फेब्रुवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

प्रेम, लग्न, कमिटमेंट, संसार अशा आधुनिक विषयांवर हा चित्रपट भाष्य करेल असं टीझर पाहून लक्षात येत आहे. यामध्ये सिद्धार्थ ‘प्रसन्न’, तर सई ‘श्रीदेवी’ ही भूमिका साकारणार आहे. टीझरच्या सुरुवातीलाच श्रीदेवी आणि प्रसन्न एकमेकांशी प्रेम व लग्नाबाबत चर्चा करताना दिसतात. आता यांची अरेंजवाली लव्हस्टोरी यशस्वी होणार की नाही? याचा उलगडा लवकरच चित्रपटगृहांमध्ये होणार आहे.

हेही वाचा : ‘का रे दुरावा’नंतर सुरुची अडारकरचं तब्बल ८ वर्षांनी ‘झी मराठी’वर पुनरागमन! ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारणार भूमिका

टीझरच्या शेवटच्या सीनमध्ये सिद्धार्थ-सई मरीन ड्राइव्ह परिसरात संसाराविषयी गप्पा मारत असतात हा सीन सर्वांचं लक्ष वेधून घेतो. टीझरमध्ये दोघांचीही उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठी कलाविश्वातील हे दोन दमदार कलाकार श्रीदेवी-प्रसन्नची प्रेमकहाणी कशी फुलवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सिद्धार्थ-सईने त्यांच्या सोशल मीडियावर हा टीझर शेअर करत त्याला “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, जगाचं भले ही सेम असेल, पण श्रीदेवी प्रसन्नचं नसतं.” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : Video: सलमान खानच्या घरी पार पडला आमिर खानच्या लेकीचा मेहेंदी कार्यक्रम, आयराच्या सावत्र आईसह भावांनी लावली हजेरी

View this post on Instagram

A post shared by Tips Films (@tipsfilmsofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटात सई ताम्हणकर व सिद्धार्थ चांदेकरसह यामध्ये सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोनेस वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचं लेखन अदिती मोघेने केलं असून याच्या दिग्दर्शनाची धुरा विशाल मोढवेने सांभाळली आहे.