अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या कामामध्ये कितीही व्यग्र असला तरी कुटुंबाला अधिकाधिक वेळ देताना दिसतो. सिद्धार्थला दोन मुली आहेत. त्यांच्याबरोबर तो अगदी धमाल-मस्ती करताना दिसतो. कामामधून वेळ काढत मुलींबरोबर बरीच भटकंतीही सिद्धार्थ करतो. तो आपल्या दोन्ही मुलींना परदेशवारीसाठी घेऊन गेला होता. आताही तो त्याच्या मुलीकडून डान्स शिकत आहे. यादरम्यानचाच एक व्हिडीओ सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

सिद्धार्थ त्याच्या मुलींबरोबरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. कलाक्षेत्रातील एखाद्या कार्यक्रमामध्ये तो त्याच्या मुलींसह हजेरी लावताना दिसतो. आताही त्याने लेक ईरासह व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ईरा सिद्धार्थला डान्स शिकवताना दिसत आहे. पण सिद्धार्थला ईराने शिकवलेला डान्स करणं जमत नसल्याचं दिसतंय. या व्हिडीओला त्याने छान कॅप्शनही दिलं आहे.

आणखी वाचा – “एकदा वेळ निघून गेली की…” ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले, “लोकांना असं वाटतं…”

सिद्धार्थ व ईरा ‘बेबी कामडाऊन’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. सिद्धार्थ म्हणाला, “जेव्हा आपली मुलगी बापाला डान्स शिकवते आणि बापाला डान्स जमत नाही. तेव्हा बापाचा आनंद Calm Down कसा होईल…” सिद्धार्थच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांचीही अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.

आणखी वाचा – Video : प्रसाद ओकबरोबर परदेशात काय घडलं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक, अभिनेता म्हणतो, “जगाच्या कानाकोपऱ्यात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच ईरा अगदी दिलखुलासपणे डान्स करताना दिसत आहे. वडील व मुलीची जोडी खूप मस्त आहे, खूप भारी व्हिडीओ, तुमची मुलगी खूप मस्त डान्स करते अशा विविध कमेंट सिद्धार्थच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. काही तासांमध्येच या व्हिडीओला १७ हजारांपेक्षा अधिक लाइक मिळाल्या आहेत.