Siddharth Jadhav on Gautami Patil: सध्या अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. दशावतार, बिन लग्नाची गोष्ट, आरपार या सिनेमांनी धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांसह कलाकारही या चित्रपटांचे भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत.

आता लवकरच आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आतली बातमी फुटली, साबर बोंडं हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. आतली बातमी फुटली या चित्रपटात सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत आहे.

या सिनेमातील ‘सखुबाई’ या गाण्यात गौतमी पाटील आहे. गौतमी पाटील व सिद्धार्थ जाधव यांनी सखुबाई या गाण्यावर डान्स केला आहे.

सिद्धार्थ जाधव काय म्हणाला?

आता अभिनेता सिद्धार्थ जाधवने गौतमी पाटीलबाबत वक्तव्य केले आहे. ‘मराठी टीव्ही मीडिया’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटातील गाण्याबाबत सिद्धार्थ म्हणाला, “डान्सची कोरिओग्राफी राहुल ठोंबरेने केली आहे. तो कमालीचा मुलगा आहे. आमची टेक्निकल टीम कमाल आहे. त्यांनी सेटअप एका दिवसात केला. आम्ही ते गाणं एका रात्रीत केलं आहे. पण, तुम्ही तो सेटअप पाहिला तर तो एका रात्रीत केलेला सेटअप वाटणार नाही. चार-पाच दिवसात केलाय असंच वाटेल. “

गौतमी पाटीलबद्दल म्हणाला, “गौतमीचा एक ऑरा आहे आणि तो छान आहे, मस्त आहे. मला काय छान वाटतं की हे लोक त्यांच्या आयुष्यात काय काय मिळवतात. पण, ते नम्र असतात आणि त्या नम्रतेचा प्रभाव पडतो. तर गौतमी पाटीलमध्ये तो नम्रपणा आहे. शूट झाल्यानंतर ती विचारायची की दादा कसं शूटिंग झालं. दादा आपण मॉनिटर बघूयात का? असं ती मला विचारायची. मी तिला म्हणायचो, तू छान कर, मस्त कर. पण, ते गाणं चांगलं झालं. पण, गाणं चांगलं झालं ते फक्त सिद्धार्थ किंवा गौतमीमुळे नाही, तर संपूर्ण टीमची मेहनत आहे.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सखुबाई हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. हे गाणे ट्रेंडदेखील झाले. गौतमी व सिद्धार्थचे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.