‘नटरंग’, ‘मितवा’, ‘पोश्टर गर्ल’, ‘हिरकणी’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनयाबरोबरच सोनालीने तिचं सौंदर्य आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सध्या सोनाली तिच्या नवऱ्याबरोबर दुबईत दिवाळी साजरी करत आहे. अभिनेत्रीने दुबईतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोनालीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरशी ७ मे २०२१ रोजी दुबईत लग्नगाठ बांधत तिच्या वैवाहिक आयुष्याला सुरूवात केली. गेल्या महिन्यांपासून अभिनेत्री शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे मुंबईत होती. परंतु, आता ती दिवाळी साजरी करण्यासाठी दुबईत पोहोचली आहे. सोनालीने दिवाळीसाठी खास पारंपरिक लूक करून फोटोशूट केलं आहे. परंतु, अभिनेत्रीच्या फोटोंपेक्षा तिने फोटोला दिलेल्या कॅप्शनने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : “मालिका अर्ध्यावर बंद करावी लागली पण…”, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत; म्हणाले, “चांगलं बघायला…”

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दुबईत नवीन घर खरेदी केल्याची गूडन्यूज सोनालीने तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. दुबईतील नव्या आलिशान घरातील फोटो शेअर करत अभिनेत्रीने “पाडवा in the new होम” असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे.

हेही वाचा : “Proud of you बायको!”, सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरने घेतली पहिली आलिशान गाडी, किंमत माहितीये का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन घर घेतल्याने सध्या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.