Sonalee Kulkarni Dance Video : मराठी कलाविश्वाची ‘अप्सरा’ म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं. ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘मितवा’, ‘पोश्टर गर्ल’ अशा बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये सोनालीने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक जीवनातील प्रत्येक अपडेट सोनाली इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकताच अभिनेत्रीने शेअर केलेला डान्स व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.

अलीकडच्या काळात सोशल मीडियावर नवनवीन गाणी व्हायरल होत असतात. सध्या इन्स्टाग्रामवर एका व्हायरल कवितेने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. ही कविता वैभव जोशी आणि अमर ओक यांच्या ऋतू बरवा कार्यक्रमामुळे चर्चेत आली आहे. या कवितेच्या ओळी आहेत…

“मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज

दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज

चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही

भरतीचा माज नाही ओटीची लाज नाही”

या व्हायरल कवितेने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. सोनाली कुलकर्णीला देखील या गाण्याची भुरळ पडली आहे. सध्या सोनाली कामानिमित्त इंग्लंड दौऱ्यावर आहे. याठिकाणी मराठमोळा लूक करून सोनालीने व्हायरल गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.

सोनाली लिहिते, “व्हायरल कवितेवर Reel व्हिडीओ बनवला नाही तर पाप लागेल…आणि ती संधी इंग्लंडमध्ये युरोपियन मराठी संमेलनच्या निमित्ताने मिळाली. अशी संधी मिळत असेल तर का बरं सोडावी?”

सोनालीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूप छान सोनाली मॅडम”, “पैठणीच्या कोणत्याही ड्रेसमध्ये ताई तू सुंदरच दिसतेस… आणि आज मराठमोळा लूक करून डान्स… कमाल”, “ट्रेंड सेटर सोनाली मॅम” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीने या व्हिडीओवर दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर येत्या काळात ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या सिनेमात प्रमुख भूमिका साकारताना दिसेल. हा सिनेमा कथालेखक आणि इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई या पुस्तकावर आधारित आहे.