मराठी मनोरंजन विश्वातील सगळेच कलाकार एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नवा चित्रपट येत असो किंवा नाटक सगळे कलाकार आपल्या मित्रमंडळींना आवर्जून सहकार्य करत असल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या प्रिया-उमेश त्यांच्या नव्या नाटकामुळे चर्चेत आहेत.

प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं ‘जर तरची गोष्ट’ गेल्यावर्षी ५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आलं. यापूर्वी प्रिया-उमेशच्या २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नवा गडी नवं राज्य’ या व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता सध्या प्रेक्षकांची ही लाडकी जोडी ‘जर तरची गोष्ट’ या नव्या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या नाटकाच्या निमित्ताने प्रियाने जवळपास दहा वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. या नाटकाचे सगळे प्रयोग सध्या हाऊसफुल सुरू आहेत. केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर आजवर अनेक कलाकारामंडळींनी देखील हे नाटक पाहिलं आहे. नुकतंच हे नाटक सोनाली कुलकर्णीने पाहिलं आणि या नाटकाबाबत अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : चाहत्याच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अभिनेता दर्शनसाठी बिर्याणी मागवली? व्हायरल व्हिडीओबाबत पोलीस म्हणाले…

सोनाली कुलकर्णीने ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या संपूर्ण टीमसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने प्रत्येक कलाकाराचं भरभरून कौतुक केलं आहे. अभिनेत्री लिहिते, “आजच्या काळातलं, पण सगळ्यांना रिलेटेबल अगदी समर्पक, पण तितकंच धमाल नाटक…माझ्या अत्यंत लाडक्या मित्रांचा म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा कमाल अभिनय! या दोघांना आशुतोष गोखले आणि पल्लवी पाटील यांनी उत्तम साथ देत धमाल जुगलबंदी केली आहे. इरावती कर्णिकचं मॅच्युअर लिखाण आणि अद्वैत दादरकर या माझ्या दादाचं भन्नाट दिग्दर्शन… संपूर्ण टीमला शुभेच्छा!”

sonalee kulkarni post
प्रिया – उमेशच्या नाटकासाठी सोनाली कुलकर्णीची पोस्ट

हेही वाचा : Video : शशांक केतकरच्या तक्रारीनंतर एका रात्रीत BMCची कारवाई, आभार मानत म्हणाला, “फक्त तोच भाग नाही, अख्खी मुंबई…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाली कुलकर्णीने ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या टीमबरोबर फोटो देखील शेअर केला आहे. नुकतीच या नाटकाने आपली शंभरी पार केली. यात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह आशुतोष गोखले, पल्लवी अजय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाचा ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ सोहळ्यात सुद्धा दबदबा पाहायला मिळाला. ‘जर तरची गोष्ट’ यावर्षीचं सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक ठरलं होतं.