‘चेकमेट’, ‘सावरखेड एक गाव’ अशा गाजलेल्या चित्रपटांमधून अभिनेत्री सोनाली खरेने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात सुद्धा सोनाली झळकली होती. कलाविश्व गाजवल्यावर वैयक्तिक आयुष्यात तिने बॉलीवूड अभिनेते बिजय आनंद यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला आता सनाया नावाची गोड मुलगी आहे. अभिनेत्रीने नुकताच ५ डिसेंबरला तिचा ४१ वा वाढदिवस केला. यानिमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार सोनालीच्या घरी तिला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.

सोनाली खरेच्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी संजय जाधव, क्षितिज पटवर्धन, सुशांत शेलार, अदिती सारंगधर, संगीतकार अमितराज, प्रिया बापट, उमेश कामत, विक्रम फडणीस, प्रियांका तन्वर, शुभांगी लटकर असे मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार गेले होते. सगळ्या जुन्या मित्रांना एकत्र घरी आलेलं पाहून सोनाली प्रचंड आनंदी झाल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय सोनालीचे पती बिजय आनंद आणि लेक सनाया या दोघांनी सुद्धा अभिनेत्रीच्या वाढदिवसाचं खास प्लॅनिंग केलं होतं.

हेही वाचा : “दोघांच्या घरातून ठळक विरोध…”, ‘अशी’ जमली शिवानी सुर्वे अन् अजिंक्यची जोडी; अभिनेत्री म्हणाली, “त्याचे बाबा…”

सोनालीने हे वाढदिवासाच्या पार्टीचे हे इनसाइड फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने सगळ्या कलाकारांचे आभार मानले आहेत. या कॅप्शनच्या शेवटी सोनालीने तिच्या तीन जवळच्या मित्रांना या पार्टीमध्ये मिस केल्याचं नमूद केलं आहे. हे ३ जण म्हणजेच सोनालीची लाडकी मैत्रीण अमृता खानविलकर, अंकुश चौधरी आणि हर्षदा खानविलकर. हे तिघेही सोनालीच्या वाढदिवसाच्या पार्टीला काही कारणास्तव उपस्थित राहिले नव्हते.

हेही वाचा : “६ पानांचा अन् सलग ६ मिनिटांचा सीन”, ‘झिम्मा २’ चित्रपटाबद्दल हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, “मी लपून बसलो…”

View this post on Instagram

A post shared by Sonali khare Anand (@iamsonalikhare)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोनाली खरेच्या प्रत्यक्ष वाढदिवसाला उपस्थित राहू शकली नाहीतरी अमृताने लाडक्या मैत्रिणीला इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या होत्या.