ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. काल तळेगाव दाभाडेजवळ आंबी या गावातील त्यांच्या घरी ते मृतावस्थेत सापडले. फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली. ते गेल्या काही महिन्यांपासून आंबी गावातील त्यांच्या घरी भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं.

सुबोध भावेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर रवींद्र महाजनी यांचा एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं, “मराठी चित्रपटातील माझं व्यावसायिक अभिनेता म्हणून पहिलं पाऊल रवींद्र महाजनी यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटातून पडले. अतिशय रूबाबदार, विलक्षण देखणे, खऱ्या अर्थाने मराठीमधील हॅंडसम नायक, कायम हसतमुख अशीच तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेली आहे. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.”

आणखी वाचा : ‘कट्यार काळजात घुसली’ला ७ वर्ष पूर्ण होताच सुबोध भावेची मोठी घोषणा, पुन्हा प्रेक्षकांना देणार सांगीतिक मेजवानी

हेही वाचा : Ravindra Mahajani Death: “आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते रवींद्र महाजनी”, पोलिसांची माहिती; म्हणाले, “मुलगा गश्मीरलाही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवींद्र महाजनी गेली अनेक वर्षं मनोरंजन सृष्टीत कार्यरत होते. मराठीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये ही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. मराठी सिनेसृष्टीतील विनोद खन्ना अशी त्यांची ओळख होती. ‘मुंबईचा फौजदार’, ‘झूंज’ आणि ‘कळत नकळत’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर आता सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.