मराठी मनोरंजन सृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्निल जोशी याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा सगळ्याच माध्यमातून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घडामोडीही सोशल मीडियावर सक्रिय राहत चाहत्यांची शेअर करत असतो. आता त्याची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

स्वप्निल जोशीचं फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे. स्वप्निल त्याच्या कामाबरोबरच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असतो. अनेकदा तो त्याच्या दोन्ही मुलांबद्दलही सोशल मीडियावरून व्यक्त होत असतो. आता आपल्या मुलांमध्ये देशप्रेम रुजावं यासाठी त्याची पत्नी लीना दोन्ही मुलांना एका खास ठिकाणी घेऊन गेली.

आणखी वाचा : “अचानक मोठी झाली यार…”; लेकीसाठी पोस्ट लिहीत स्वप्निल जोशी भावूक

स्वप्निलने काल सोशल मीडियावर त्यांच्या मुलांचे काही फोटो पोस्ट केले. स्वप्निलची पत्नी लीना मुलांना बोरिवली येथील डिफेन्स एक्झिबिशनमध्ये घेऊन गेली होती. तिथे त्यांनी भारतीय सैन्याबद्दल भरपूर माहिती मिळवली. हे फोटो शेअर करत त्याने लिहिलं, “नुकतीच ही मुलं डिफेन्स एक्झिबिशन पाहून घरी परतली. रविवारी दुपारी त्यांना तिथे नेल्याबद्दल धन्यवाद लीना. ते घरी असल्यापासून प्रत्येक गोष्टीला जय हिंद म्हणत आहेत. अजुन काय पाहीजे ! त्यांच्यामध्ये देशप्रेम रुजवण्याचं आणि त्यांना आपल्या सैन्यातील जवानांच्या बलिदानाची आणि भारतावरील प्रेमाची ओळख करून देण्याचं हेच योग्य वय आहे! खऱ्या आयुष्यातील हिरोंना पाहण्यापासून ते सैन्याच्या टँकमध्ये बसण्यापर्यंत, ते त्यांच्याशी बांधले गेले आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे. जय हिंद!”

हेही वाचा : Video: “शेवट कधीच सोपा नसतो…” स्वप्निल जोशीची भावूक पोस्ट, व्हिडीओ चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता स्वप्निलची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. यावर कमेंट करत त्याचे चाहते त्याचं आणि त्याच्या पत्नीचं, ते मुलांवर करत असलेल्या संस्कारांबद्दल कौतुक करत आहेत.