साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदाना नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर रश्मिका मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. मात्र, सध्या रश्मिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर रश्मिकाचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या व्हिडीओबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- मुंबईच्या वाहतूक कोंडीला कंटाळली रिंकू राजगुरु, फोटो पोस्ट करत म्हणाली…

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. तेजस्विनीने कमेंट करत लिहिलं, “टेक्नोलॉजीचा वापर कसा केला जाऊ नये, याचं हे उत्तम उदाहरण आहे. AIचा योग्य पद्धतीने वापर केला गेला नाही तर ते आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतं. सतर्क राहा.”

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हायरल व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातलेली एक मुलगी लिफ्टमध्ये आत येताना दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहूब रश्मिकासारखा आहे. त्या मुलीने रीलिव्हिंग ड्रेस घातला आहे. हा व्हि़डीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तपासानंतर हा व्हिडीओ बनावट असल्याचे समोर आले आहे. अभिषेक नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. व्हिडीओत दिसणारी मुलगी ही रश्मिका नाही, तर एक ब्रिटिश-भारतीय तरुणी आहे. या तरुणीचं नाव झारा पटेल आहे. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून झाराच्या चेहऱ्यावर रश्मिका मंदानाचा चेहरा लावण्यात आला असल्याचे समोर आलं आहे.

हेही वाचा- “हेल्मेट रागाच्या भरात फेकून…”, अँजेलो मॅथ्यूजच्या टाईमआऊटवर मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, “आयुष्यात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल व्हिडीओवर रश्मिकाने ट्विट करत प्रतिक्रियाही दिली आहे. रश्मिकाने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. रश्मिकाने टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच व्हायरल बनावट व्हिडीओनंतर पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे रश्मिकाने आभार मानले आहेत.