लहानपणी आपण ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही कथा नक्कीच ऐकली असेल. मात्र, आता याच नावाचा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. आता नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

अभिनेत्री मुक्ता बर्वेने या गाण्याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘थोडा टाईट थोडा लूज साला कॅरॅक्टर’ असे या गाण्याचे बोल आहेत. शालमली खोलगडेने हे गाणे गायले आहे. तर वैभव जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. अजित परब यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. सोशल मीडियावर हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, या गाण्याला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे.

येत्या २९ मार्चला हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांच्यासारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. : नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आदित्य इंगळे यांनी सांभाळली आहे.

हेही वाचा-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे. नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजित परब यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून वैभव जोशी यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली आहे.