केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तसेच या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. या चित्रपटाला महिला वर्गाकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाने चित्रपटगृह मालक अक्षरश: भांबावून गेले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत सुकन्या मोनेंनी याबाबत एक किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- “एक लक्षात ठेवा…”; नोकरी सोडून अभिनय करु इच्छिणाऱ्या जयंत सावरकरांना पत्नीने दिलेला मोलाचा सल्ला

सुकन्या मोने म्हणाल्या, “बाईपण भारी देवा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही पुण्यातील एका चित्रपटगृहात गेलो होतो. या चित्रपटाला बायकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून चित्रपटगृहातील एका शिपायाने आमच्याकडे व्यथा मांडली. ते म्हणाले. हैराण केलंय बायकांनी. आजपर्यंत कोणत्याच चित्रपटाच्या पोस्टरजवळ उभारून कुणीही एवढे फोटो काढले नव्हते. आत्तापर्यंत जवळपास १५ हजार बायकांनी या पोस्टरजवळ उभारुन फोटो काढले आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने आत्तापर्यंत ६५.६१ कोटींची कमाई केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. महिलांवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला पुरुष वर्गाकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाततीत या चित्रपटाने रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या वेड चित्रपटालाही मागे टाकले आहे.