‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक कायमच स्थान निर्माण केलं आहे. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेल्या या मालिकेने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण तरीही अजून ही मालिका चर्चेत असते. या मालिकेतील कलाकार आता नवनवीन मालिका, चित्रपटात पाहायला मिळत आहेत. अशातच ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील लाडकी अप्पू अर्थात अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चाहत्यांना एक सरप्राइज दिलं आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं आहे, “अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्हा सर्वांसाठी एक सरप्राइज. माझा नवीन प्रोजेक्ट तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ‘मुंबई लोकल’ हा माझा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नेहमीप्रमाणे तुमच्या आशीर्वाद व प्रेमाची गरज आहे. गणपती बाप्पा मोरया.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर तिच्या नव्या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि मनमीत पेमबरोबर झळकणार आहे. आज या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला आहे. सिद्धिविनायकच्या चरणी आशीर्वाद घेऊन ‘मुंबई लोकल’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. याचाच व्हिडीओ ज्ञानदाने शेअर केला आहे. या व्हिडीओत, ज्ञानदासह प्रथमेश व पृथ्वीक पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – Video: २० वर्षांचा ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोजिक लवकरच चढणार बोहल्यावर; आनंदाची बातमी देत जाहीर केली लग्नाची तारीख

ज्ञानदाचं हे सरप्राइज पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. अभिनेता चेतन वडनेरे, तन्वी बर्वे, पृथ्वीक प्रताप यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. “अभिनंदन”, “मी खूप आनंदी आहे. माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा”, “आभाळभर शुभेच्छा ज्ञानदा. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खूप गोड बातमी दिलीस. सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. आमची अप्पू आता मोठ्या पडद्यावर येणार,” अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – “…म्हणून अजूनही मी २३ वर्षांचा आहे”, अभिनेते मिलिंद गवळींची पत्नीसाठी सुंदर पोस्ट; म्हणाले, “दीपाचा हा कितवा वाढदिवस…”

दरम्यान, बिग ब्रेन प्रोडक्शन्स निर्मित ‘मुंबई लोकल’ चित्रपटाच दिग्दर्शन अभिजीत करणार आहेत. तर छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळींवर आहे. आता ज्ञानदा, प्रथमेश आणि पृथ्वीकच्या ‘मुंबई लोकल’ नवा चित्रपट प्रेक्षकांच्या कधी भेटीस येणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.