मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे प्रिया बापट व उमेश कामत. प्रिया व उमेशकडे एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतरही दोघांमधील प्रेमाचा गोडवा कायम तसाच आहे हे दिसून येतं. सोशल मीडियाद्वारे प्रिया व उमेश एकमेकांबाबत व्यक्त होताना दिसतात. तर त्यांच्या कुटुंबियांविषयी अनेक पोस्ट शेअर करताना दिसतात.

आज प्रियाचे वडील शरद बापट यांचा ८१वा वाढदिवस आहे. याचनिमित्त प्रियाने तिच्या वडिलांसाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे. तसेच वडिलांबाबत ती यावेळी भरभरुन बोलली. तिने वडिलांबरोबरचे काही फोटोही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. प्रियानंतर उमेशनेही सासऱ्यांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील परीची हिंदी मालिकेमध्ये एंट्री, प्रोमो पाहून प्रार्थना बेहरेची कमेंट, म्हणाली, “बेबी…”

उमेशने प्रियाच्या वडिलांबरोबरचा फोटो शेअर केला. तसेच त्यांचं कौतुकही केलं. उमेशने सासऱ्यांना वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, “प्रिय बाबा, तुम्हाला ८१व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. सासरे असूनही तुमच्या मुलीपेक्षा माझी बाजू जास्त घेता यावर प्रिया चिडत असली तरी मला खूप आनंद वाटतो”.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गौरव मोरेचा सतत अपमान का होतो? अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “कधी कधी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्ही जावयासारखं नाही, वडिल- मुलांसारखं हक्काचं नातं आपल्यात तयार होऊ दिलंत. तुमचं मेहनती असणं, साधं राहंणं, सतत सक्रिय राहणं, काम करत राहणं हे माझ्यासाठी कायम आदर्श असेल”. उमेशने शेअर केलेल्या या पोस्टनंतर त्याचं त्याच्या सासऱ्यांबरोबर असणारं घट्ट नातं दिसून आलं.