प्रिया बापट व उमेश कामत यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या दोघंही त्यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकामुळे प्रचंड चर्चेत आहेत. या नाटकाच्या निमित्ताने प्रिया-उमेश जोडीने कलर्स मराठीच्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यावेळी लाडक्या जोडीला प्रत्यक्ष पाहून स्पर्धकही चांगलेच उत्साही झाल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका रसिका सुनीलने या दोघांना एकमेकांबद्दल काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची प्रिया-उमेशने हटके व मजेशीर उत्तरं देत सर्वांचं मन जिकलं.

रसिकाने सर्वात आधी उमेश कामतला “जर प्रिया तुमच्या लग्नाचा किंवा तुझा वाढदिवस विसरली तर काय करशील?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेता म्हणाला, “अगं हे अगदीच शक्य आहे. कारण, प्रियाच्या फार तारखा लक्षात राहत नाही. त्यामुळे ती विसरणं सहज शक्य आहे. याबद्दल सांगायचं झालं, तर आमच्या लग्नाची तारीख आहे ६ ऑक्टोबर, तर ती अगदी आत्मविश्वासाने आपल्या लग्नाची तारीख १० ऑक्टोबर आहे असं सांगून माझ्याशी भांडत होती. ऑक्टोबर महिना दहावा असल्याने ती गोंधळून गेली होती.” उमेशचा खुलासा ऐकून भर कार्यक्रमात एकच हशा पिकला.

हेही वाचा : “माझ्या बॉयला मिळणारे पैसे…”, श्वेता शिंदेने सांगितली मराठी व हिंदीमधील मानधनातील तफावत; ‘तो’ प्रसंग आठवत म्हणाली…

रसिकाने यानंतर प्रियाला “उमेशचा एखादा आवडता पदार्थ बंद करायचा असेल तर तो पदार्थ कोणता असेल?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, “त्याला खाणं प्रचंड आवडतं त्यामुळे असा कोणताच पदार्थ नाही.” एवढ्यात समोरच बसलेला ‘जर तरची गोष्ट’ नाटकाचा दिग्दर्शक अद्वैत दादरकर म्हणाला, “प्रियाचं डोकं खाणं बंद करावं…” त्याचा आवाज ऐकून प्रिया म्हणते, “अद्वैत अगदी बरोबर बोलतोय त्याने माझं डोकं खाणं बंद करावं. कारण ते उमेशला प्रचंड आवडतं.”

हेही वाचा : “तो आमच्याकडे बघून…”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबद्दल कुटुंबियांनी दिली अपडेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या निमित्ताने प्रिया बापटने ‘नवा गडी नवं राज्य’नंतर जवळपास १० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. अलीकडच्या तरुणाईवर भाष्य करणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.