२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट पाहताच बॉलीवूड अभिनेता सलमान खानने हिंदीत ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक करायचा ठरवलं होतं. ‘अंतिम : द फाइनल ट्रुथ’ असं हिंदीतील चित्रपटाचं नाव होतं. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाविषयी आता दिग्दर्शक प्रवीण तरडे व अभिनेते उपेंद्र लिमये यांनी आपली परखड मतं व्यक्त केली आहेत.

हेही वाचा – सुनील बर्वे साकारणार सुधीर फडकेंची भूमिका; म्हणाले, “आजपासून तुमचं…”

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Devendra fadanvis calrification on Uddhav Thackeray statement
‘हो, मी आदित्यला…’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीस स्पष्टच म्हणाले, “मला वेड…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

‘बोल भिडू’ या युट्यूब चॅनेलवरील ‘दिलखुलास गप्पा’ या कार्यक्रमात बोलताना प्रवीण तरडे व उपेंद्र लिमये ‘अंतिम : द फाइनल ट्रुथ’ चित्रपटाविषयी बोलले. उपेंद्र लिमेय म्हणाले की, ” ‘मुळशी पॅटर्न’ पाहिल्यावर कॉलर तोंडात पकडून व्हॉट अ फिल्म, व्हॉट अ फिल्म करणाऱ्या सलमान खानने जेव्हा प्रत्यक्षात तो चित्रपट केला तेव्हा त्याची वाट लावून टाकली.”

यावर प्रवीण तरडे म्हणाले की, “तो त्यांनी केला. महेश सर (महेश मांजरेकर) यांनी दिग्दर्शित केला. माझा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. आज मी जाहीरपणे सांगू का? मी अजूनही ‘अंतिम’ नावाचा चित्रपट पाहिला नाही आणि मी तो पाहण्यासाठी धाडस करणार नाही. कारण माझ्या हृदयात आणि डोक्यात ‘मुळशी पॅटर्न’ आहे.”

हेही वाचा – स्पृहा जोशीच्या बहिणीनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलंय नाव; अभिनेत्री म्हणाली, “जागतिक पातळीवर…”

यानंतर उपेंद्र लिमये म्हणतात की, “प्रश्नच नाही. मी दोन्ही चित्रपटांत काम केलेलं आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, जितकी प्रामाणिक, अस्सलं मातीतली कलाकृती प्रवीण तरडेने केली ना. हिंदीत सर्वोकृष्ट करण्याच्या नावाखाली या चित्रपटातला जीवच घालवून टाकला, असं मला वाटतं. जरी तो ‘मुळशी पॅटर्न’ जसाच्या तसा हिंदीत केला असता, तरी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असता.”

हेही वाचा – “… तर ‘मुळशी पॅटर्न’ १०० कोटी क्रॉस केलेला चित्रपट असता”; दिग्दर्शक प्रवीण तरडे खंत व्यक्त करीत म्हणाले…

पुढे प्रवीण तरडे म्हणाले की, “माझं तर म्हणणं होतं, फक्त आयुष शर्माला घ्या, बाकी सगळी टीम मराठीत जी होती तीच ठेवा. तोच दया, तोच पिट्या, तोच प्रवीण, तोच उप्या आख्ख तेच ठेवा बदलूच नका.” “पण तो चांगला करण्याच्या नावाखाली त्या चित्रपटाचा आत्माच हरवून बसले”, असं स्पष्टच उपेंद्र लिमये म्हणाले. त्यानंतर तरडे म्हणाले की, “पण मला बरं झालं असं वाटतं. कारण ज्यावेळी मी हिंदीत चित्रपट करेन, तो मी माइलस्टोन चित्रपट करेन.”

दरम्यान, ‘अंतिम : द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली होती. या चित्रपटात सलमान खान, आयुष शर्मा, महिमा मकवाना हे प्रमुख भूमिकेत आहेत.