संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला आणि सर्वत्र मराठी अभिनेते उपेंद्र लिमयेंच्या फ्रेडी पाटील भूमिकेची चर्चा रंगली. ‘अ‍ॅनिमल’मध्ये त्यांनी शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डिलरची भूमिका साकारली आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, शक्ती कपूर, रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिकांप्रमाणे चित्रपटात उपेंद्र लिमये, तृप्ती डिमरी आणि अभिनेता बॉबी देओलने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. ‘अ‍ॅनिमल’च्या यशावर आणि बॉबीच्या कमबॅकवर उपेंद्र लिमयेंनी एबीपी माझा कट्टाच्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

वयाच्या चाळीशीनंतर अलीकडे बऱ्याच अभिनेत्यांना सूर गवसला आहे का? याबाबत सांगताना उपेंद्र लिमये म्हणाले, “वयाच्या चाळीशीनंतर कदाचित बॉबीने गोष्टी अधिक गांभीर्याने घेतल्या असतील असं मला वाटतंय. बॉबी माणूस म्हणून अतिशय चांगला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोघंही एकत्र खूप क्रिकेट खेळलोय. सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये अनेकदा बॉबी बॉलिंग आणि मी बॅटिंग करतोय असे प्रसंग उद्भवले आहेत. तेव्हापासून आमची ओळख आहे.”

Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
jaya bachchan opens up on relationship with amitabh bachchan
जया बच्चन यांनी बिग बी यांच्याबरोबरच्या नात्याबाबत केला खुलासा, नातीच्या शोमध्ये म्हणाल्या, “माझे पती…”

हेही वाचा : ‘देवमाणूस’ फेम माधुरी पवारने खरेदी केलं आलिशान घर! स्वप्नपूर्ती म्हणत अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश

“मला वाटतं, बॉबीला या चित्रपटाच्या निमित्ताने अतिशय चांगली आणि त्याला साजेशी अशी भूमिका मिळाली. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याच्या मुलाखती तुम्ही पाहिल्या असतील, तर तो प्रचंड भावुक होत असल्याचं तुम्हाला दिसेल. चित्रपटाला मिळणारं यश पाहून बॉबी संदीपला म्हणाला होता, आयुष्यात एवढं प्रेम मला कधीच मिळालं नाही आणि माझ्या कोणत्याच कलाकृतीची एवढ्या मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली नव्हती. बॉबीचे अनेक चित्रपट हिरो म्हणून वर्क झाले नाहीत. त्या सगळ्या गोष्टी त्याला या ‘अ‍ॅनिमल’मधील फक्त २० ते २५ मिनिटांच्या भूमिकेने दिल्या.” असं उपेंद्र लिमयेंनी सांगितलं.

हेही वाचा : Bigg Boss 17 : “मुनव्वरचा हात पकडते, मिठी मारते…”, अंकिता लोखंडे-विकी जैनमधील वाद टोकाला, नेमकं काय घडलं?

‘अ‍ॅनिमल’च्या यशानंतर उपेंद्र लिमये या चित्रपटाचा दुसरा भाग ‘अ‍ॅनिमल पार्क’मध्येही महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. दरम्यान, १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करून एकूण ८५० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. आता प्रेक्षकांच्या मनात ‘अ‍ॅनिमल’च्या दुसऱ्या भागाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आता दुसऱ्या भागात कोणकोणते कलाकार झळकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.