मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून वंदना गुप्ते यांना ओळखलं जातं. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात त्या प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात वंदना गुप्तेंनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बकेट लिस्ट’ चित्रपटात वंदना गुप्ते व बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात एकत्र काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

वंदना गुप्तेंना यावेळी माधुरी दीक्षित आणि त्यांचा ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाच्या सेटवरचा खास फोटो दाखवण्यात आला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगत अभिनेत्री म्हणाल्या, “आमच्या चित्रपटाचं शूटिंग मढला झालं होतं. मी तिच्याबरोबर आतापर्यंत एकाच चित्रपटात काम केलंय. रिडिंगच्या वेळी पहिल्यांदा मी तिला पाहिलं तेव्हा अगदी साधी आणि छान तयार होऊन ती आली होती.”

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”

हेही वाचा : अनन्या पांडेच्या बहिणीला मुलगा होणार की मुलगी? अलानाने बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल, व्हिडीओ व्हायरल

वंदना गुप्ते पुढे म्हणाल्या, “तिला पहिल्याच दिवशी मी सांगितलं, मला तुझ्याबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती…तुझं काय ते मला माहिती नाही पण, माझी एक अट आहे ती म्हणजे…तू माझ्याबरोबर रोज एक सेल्फी काढायचा. त्यानंतर मी विसरले तरी माधुरी आठवणीने सेल्फी काढायची. आमचे बरेच सेल्फी मी शेअर केले आहेत.”

हेही वाचा : कलर्स मराठीवर सुरू होणार नवीन मालिका; कोण आहे चिमुकली ‘इंद्रायणी’? ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये केलंय काम

“संसार सांभाळून, मराठी संस्कृती- परंपरा जपून आणि त्यात दोन मुलांचा सांभाळ हे सगळं तिने उत्तमप्रकारे केलं. खरंच ती घरंदाज आहे. जगभरात नाव कमावून देखील ती अत्यंत साधी आहे. अनेकदा सतत हिंदीत संवाद साधल्याने तिला मराठी कठीण शब्दांचा उच्चार करताना अडचणी यायच्या. पण, अशावेळी ती आवर्जून तिची अडचण आम्हाला विचारायची. पहिल्या चित्रपट करताना तिला थोडं दडपण आलं होतं. याशिवाय माधुरी खाण्याची प्रचंड आवड आहे. तिच्यासाठी भारतीने एकदा मोदक बनवून पाठवले होते. तिला मोदक प्रचंड आवडतात.” असं वंदना गुप्तेंनी सांगितलं.

माधुरीला कोणकोणते मराठमोळे पदार्थ आवडतात याबद्दल सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या, “भारती एकदा मोदक घेऊन सेटवर आली तेव्हा ‘भारती ताई तुम्ही तूप नाही आणलं का?’ असं तिने स्वत:हून विचारलं होतं. मोदक, वरणभात, थालीपीठ हे तिचे आवडते पदार्थ आहेत.”