‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा शो आवडीने पाहिला जातो. या शोमधील कलाकार विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. अनेक कलाकारांना महाराष्ट्राची हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्री वनिता खरातलाही हास्यजत्रेमुळे लोकप्रियता मिळाली.

विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या वनिता खरातने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘सरला एक कोटी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात वनिता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटातही वनिता झळकली होती. आता वनिता बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा>> “माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी…” रोहित शेट्टीचं मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल, पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या रोहित शेट्टीच्या मराठी चित्रपटात वनिताला काम मिळालं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यात वनिताची झलक पाहायला मिळाली आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात वनितासह अभिनेता जितेंद्र जोशी, तेजस्वी प्रकाश, करण किशोर, प्रसाद जवादे हे कलाकारही आहेत.

हेही वाचा>> ३० वर्षांनंतर ‘माहेरची साडी २’ येणार? चित्रपटाच्या सिक्वेलबाबत अलका कुबल म्हणाल्या, “मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शेट्टीने या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ हा रोहित शेट्टीचा पहिलाच मराठी चित्रपट असून या चित्रपटाची निर्मिती त्याने केली आहे. या चित्रपटाचं कथानक शाळा, महाविद्यालयीन जिवनामुळे व्यक्तीची होणारी जडणघडण व आयुष्याला मिळणारं वळण यावर आधारित आहे.