रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी सध्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गेले अनेक दिवस त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अखेर ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. या चित्रपटाला मोठं यश मिळताना दिसत आहे. आता सर्वात जास्त कमाई करणारा ‘सैराट’ पाठोपाठ ‘वेड’ हा दुसरा चित्रपट ठरला आहे.

‘वेड’ या चित्रपटाने रिलीजच्या काही दिवसातच नवे विक्रम रचायला सुरुवात केली. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने मोडला. तर रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘लय भारी’चा रेकॉर्डही ‘वेड’ने मोडला. आता या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.

आणखी वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या अहवालानुसार, वेड हा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर या यादीत पहिला क्रमांक ‘सैराट’चाच आहे. या चित्रपटाने परवा (शुक्रवारी) १.३५ कोटींची कमाई केली, तर काल (शनिवारी) ‘वेड’ची कमाई २.७२ कोटी आहे. तर हा चित्रपट शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी आणखीन जास्त कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ४४.९२ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता लवकरच हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार आहे.

हेही वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय, यातील संवाद, गाणी हे सर्वच प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा आकडा पार करेल अशी खात्री सर्वांनाच आहे.