रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी सध्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गेले अनेक दिवस त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अखेर ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. या चित्रपटाला मोठं यश मिळताना दिसत आहे. हेच यश मिळत असल्यामुळे या चित्रपटाच्या टीमने नुकतीच एक सक्सेस पार्टी केली.

‘वेड’ या चित्रपटाने रिलीजच्या काही दिवसातच नवे विक्रम रचायला सुरुवात केली. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने मोडला. तर रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘लय भारी’चा रेकॉर्डही ‘वेड’ने मोडला. दोन आठवड्यात या चित्रपटाने एकूण ४०.८५ कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाच्या यशस्वी कामगिरीमुळे या चित्रपटाच्या टीमने नुकतंच मुंबईत जोरदार सेलिब्रेशन केलं.

आणखी वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

हेही वाचा : ‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”

त्यांच्या या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी या चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. तसंच यावेळी ‘वेड’चं नाव लिहिलेला केकही कापण्यात आला. या सर्वांनी मिळून ‘वेड लावलंय’ या गाण्यावर नाचही केला. ‘वेड’ चित्रपटाच्या कामगिरीमुळे सर्वच जण खूप खुश होते. सर्वांनीच सेलिब्रेशन एन्जॉय केलं.

हेही वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत भांडू लागली, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. या चित्रपटाची कथा कलाकारांचा अभिनय यातील संवाद गाणी या हे सर्वच प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडलं आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा आकडा पार करेल अशी खात्री सर्वांनाच आहे.