‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय ठरला. कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवे विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून धरलं. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही घोषणा करण्यात आली.

हेही वाचा- मराठी चित्रपटांना स्क्रीन का मिळत नाहीत? केदार शिंदेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले “महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये…”

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’मध्ये प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. पण या भूमिकेसाठी प्रसाद ओक निर्मात्यांची पहिली पसंती नव्हता. आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने यांना विचारण्यात आलं होतं. प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता.

हेही वाचा- “त्यांनी वडा खाल्ला आणि…” ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला…

प्रवीण तरडे म्हणालेले, “जेव्हा माझे चीफ एडिटर विनोद वनवे यांनी आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी जेव्हा प्रसाद ओक यांच नाव सजेस्ट केलं होतं तेव्हा मी त्यांना विचारलं होतं प्रसाद कसा दिघे साहेब दिसेल.” त्यानंतर वनवे यांनी आनंद दिघे यांचे काही स्केचेस तयार केले आणि प्रविण तरडे यांना दाखवले. त्यातला एक लूक फायनल झाल्यानंतर वनवे म्हणाले, हा प्रसाद ओक आहे.

हेही वाचा- सई ताम्हणकरने सोनाली कुलकर्णी व तिच्या नवऱ्याला ठेवलं होतं उपाशी, खुलासा करत म्हणाली, “कारण…”

वनवे यांनी प्रसाद ओक याच्या फोटोला आनंद दिघे यांच्यासारखी दाडी आणि मिशी लावली होती. आणि त्यांचे ग्राफिक्स तयार केलं होतं. तो लूक प्रविण तरडेंना आवडल्यानंतर आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकच साकारणार असे प्रविण तरडेंनी निश्चित केलं.

हेही वाचा- “माझी २ महिन्याची लेक ५ तास उपाशी होती अन् मी…”, प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेने शेअर केला डिप्रेशनचा अनुभव

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटात आनंद दिघे यांच्या राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचंही दाखविण्यात आलं होतं. त्यामुळे आता या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवले जाणार आहे, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. २०२४ मध्ये धर्मवीर चित्रपटाचा पुढील भाग प्रदर्शित होणार आहे.