Zee Marathi Chitra Gaurav 2024 : मराठी कलाविश्वात सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा दिग्गजांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. मराठी मनोरंजनसृष्टीत उत्तम कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा या सोहळ्यात सन्मान केला जातो. यंदा पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, सारा अली खान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष उपस्थिती लावली होती.

‘झी चित्र गौरव’मध्ये यावर्षी ‘श्यामची आई’, ‘बापल्योक’, ‘महाराष्ट्र शाहीर’ व ‘बाईपण भारी देवा’ या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये पुरस्कार जिंकण्यासाठी चांगलीच चुरस रंगली होती. अखेर यंदाच्या वर्षी केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बाईपण भारी देवा’ला लोकप्रिय चित्रपटाचा बहुमान मिळाला. तर सर्वोत्कृष्ट चित्रपटावर एका खास चित्रपटाने नाव कोरलं आहे.

हेही वाचा : Video : “काय पाव्हणं आला का…”, ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात सारा अली खानची मराठीत शायरी! व्हिडीओ व्हायरल

यंदाचा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा अविस्मरणीय ठरला कारण, अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला या कार्यक्रमात पाहायला मिळाले. यावेळी शिल्पा शेट्टीने रंगमंचावर मिरचीचा ठेचा बनवून दाखवला, तर बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने “ऐका दाजिबा…” गाण्यावर खास डान्स केला.

हेही वाचा : शुभमंगल सावधान! क्रिती खरबंदा-पुलकित सम्राट लग्नबंधनात अडकले, शाही सोहळ्याचे फोटो आले समोर

मृण्मयी देशपांडे आणि गश्मीर महाजनी या दोघांनी या कार्यक्रमात रामायणावर आधारित एक खास सादरीकरण केलं. याशिवाय भाऊ कदम, निलेश साबळे, अमेय वाघ यांनी उपस्थित प्रेक्षकांना खळखळून हसवलं. यावर्षी ‘झी गौरव’ला कोणते चित्रपट व कलाकारांनी बाजी मारली जाणून घेऊया…

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची संपूर्ण यादी

१. सर्वोत्कृष्ट रंगभूषा पुरस्कार – महेश बराते (श्यामची आई)
२. सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार – नामदेव वाघमारे (श्यामची आई)
३. सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार – युगेशा ओमकार (महाराष्ट्र शाहीर)
४. सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन – अमेय भालेराव (श्यामची आई)
५. सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – कृती महेश (महाराष्ट्र शाहीर)
६. सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – विजय मिश्रा (श्यामची आई)
७. सर्वोत्कृष्ट गीतकार – क्षितीज पटवर्धन (उनाड)
८. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका -नंदिनी श्रीकर (क्षण कालचे, उनाड)
९. मराठी पाऊल पडते पुढे पुरस्कार – अभिनेत्री प्रिया बापट(Priya Bapat )
१०. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता -विठ्ठल काळे (बापल्योक)
११. सर्वोत्कृष्ट संवाद – विठ्ठल नागनाथ काळे, मकरंद शशिमधू माने (बापल्योक)
१२. सर्वोत्कृष्ट कथा – मधुगंधा कुलकर्णी (वाळवी)
१३. सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी – अमेय वाघ, वैदेही परशुरामी
१४. सर्वोत्कृष्ट पदार्पण – सना शिंदे
१५. महाराष्ट्राचा हास्यसम्राट – लक्ष्मीकांत बेर्डे
१६. ‘झी चित्र गौरव २०२४’ जीवनगौरव पुरस्कार २०२४ – उषा मंगेशकर
१७. नॅचलर परफॉर्ममर ऑफ द इयर – सायली संजीव
१८. विशेष उल्लेखनीय कामगिरी – अंकुश चौधरी
१९. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार – त्रिशा ठोसर (चिमी, नाळ २)
२०. प्रभावी व्यक्तिमत्त्व पुरस्कार – सोनाली कुलकर्णी
२१. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा परब चौधरी (बाईपण भारी देवा)
२२. सर्वोत्कृष्ट अभिनेता – शशांक शेंडे (बापल्योक)
२३. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बापल्योक – मकरंद शशिमधू माने
२४. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – बाईपण भारी देवा
२५. सर्वोत्कृष्ट चित्रपट – बापल्योक

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांवर सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.