करण जोहर बॉलिवूडच्या यशस्वी दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये गणला जातो. नुकताच करणनं ५० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या वाढदिवसाच्या पार्टीला बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. करण जोहरच्या ५० व्या वाढदिवशी अनेक कलाकारांनी त्याच्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. यात सोलापूरचा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरचाही समावेश आहे. अक्षयनं करण जोहरच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली फेसबुक पोस्ट आता चांगलीच चर्चेत आहे. कारण याच पोस्टमधून अक्षयनं तो करण जोहरसोबत काम करणार असल्याची माहिती दिली.

करण जोहरच्या ५० व्या वाढदिवशी अक्षय इंडीकरने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहून त्याला शुभेच्छा दिल्या. यासोबतच लवकरच तो करण जोहरसोबत काम करणार असल्याची गोड बातमीही शेअर केली. अक्षय इंडीकरची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यानंतर अनेक युजर्सनी कमेंट करत अक्षयवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

ravi jadhav shares post for chinmay mandlekar
“महाराष्ट्र सरकार आणि सायबर सेलकडे…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाची चिन्मय मांडलेकरसाठी पोस्ट, म्हणाले…
all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
kiran mane reacted on rohit pawar ED inquiry
“ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

करणच्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये अक्षयनं लिहिलं, “ज्या माणसाबद्दल फक्त ऐकून होतो लहानपणापासून ‘कुछ कुछ होता है’ अगणित वेळा बघितला होता. देशातल्या एवढ्या मोठ्या बॉलिवूड नामक प्रकरणाचा खरा बादशहा जर कोण असेल तर तो हा माणूस. मला कधीच वाटलं न्हवतं मी करण जोहर च्या धर्मा प्रोडक्शन सोबत काम करेल आणि हे स्वप्न पण बघण्याचं काही कारण न्हवतं. पण काही स्वप्नं आपल्या नकळत आपण मनाशी बाळगत असतो. स्वतः दिगदर्शक असलेल्या स्वतःच्या कंपनीत शेकडो नव्या फिल्ममेकरला संधी देणारा हा माणूस अनेक तरुण फिल्म मेकरला उभं करतोय. आज करण जोहरचा वाढदिवस. आमची पहिली भेट त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या पार्टीत होईल असं वाटलं न्हवतं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा करण जोहर सर.”

दरम्यान अक्षय इंडीकरच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने आतापर्यंत ‘उदाहरणार्थ नेमाडे’, ‘त्रिज्या’, ‘स्थलपुराण’ या चित्रपटांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या माध्यमातून अक्षयने आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांची आणि सोबतच स्वतःची देखील वेगळी ओळख निर्माण केली आहे.