नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या ‘झुंड’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचं अनेक मराठी कलाकारांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. याच दरम्यान निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी फेसबुकवर नाटकी कलाकारांची झुंडशाही अशी पोस्ट टाकली असून नाव न घेता मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांवर टिका केली आहे. महेश टिळेकर यांनी ही टिका झुंडच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

महेश यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “नाटकी कलाकारांची झुंडशाही, स्वयंघोषित स्टार कलाकारांची स्तुती करणारे काही ग्रुप, टोळी मराठी चित्रपटसृष्टीतली आहेत. अभिनय आणि चित्रपट कोळून पिल्यासारखे फक्त आपल्याच स्टार कलाकारांच्या चित्रपटावर भरभरून बोलणारी ही मंडळी नवीन कुणाचा, म्हणजेच बाहेरून आलेला कलाकार किंवा दिग्दर्शक असेल तर त्याच्या चित्रपटाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. स्वतः ला सुपरस्टार समजणारे हे काही ठराविक लोक पृथ्वी जशी शेष नागाच्या डोक्यावर तरलेली आहे तशी मराठी चित्रपटसृष्टी यांच्यामुळे आणि यांच्या चित्रपटांमुळेच तग धरून आहे याची जाणीव इतरांना करून देताना स्वतःची अक्कल पाजळत असतात”, असे महेश म्हणाले.

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

आणखी वाचा : जिनिलिया माहेरी जाणार ऐकताच, रितेश देशमुखने गायलं हे गाणं; Video पाहून हसू आवरणार नाही

आणखी वाचा : तैमूरने वडील सैफ अली खानवर उचलला हात, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अमीर बाप की…”

पुढे महेश म्हणाले, “काही दिवसांपूर्वी याच टोळीतील काही कलाकारांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. मी थिएटरमध्ये जाऊनच प्रत्येक मराठी चित्रपट पाहत असल्यामुळे तो नवीन प्रदर्शित झालेला चित्रपट पहायला गेलो. तर शो कॅन्सल झालेला, दुसऱ्या दिवशी आणखी एका थिएटर वर पोहोचलो, तिथेही तीच अवस्था. शेवटी भांडून दोन तिकिटं काढून मित्रा बरोबर चित्रपट पाहिला. थिएटरमध्ये एकूण सातजणच होते. पुरस्कार सोहळे, टिव्ही चॅनेलवरील रिअॅलिटी शोमध्ये स्वतः च्या नावाचा स्टार, सुपरस्टार म्हणून गवगवा करणारे आणि कामासाठी भरपूर पैसे घेणारे हे स्टार स्वतः अभिनय केलेल्या चित्रपटासाठी प्रेक्षक थिएटर पर्यंत आणण्याचा करिश्मा दाखवू शकत नाही, याचे दुःख झाले पण प्रेस, मीडिया समोर बोलताना त्या चित्रपटातील आणि चित्रपट पाहायला स्टायलिश कपडे घालून आलेले हे ठराविक ग्रुपमधील कलाकार एकमेकांची अशी काही तळी उचलत होते. असा उदो उदो करत होते की राजदरबारी असणारे भाट पण कमी पडतील. आमचा चित्रपट मानवी भावनांचे कंगोरे दाखवणारा, संवेदनशील मनाला आर्त साद घालणारा, असे साजूक तुपातील, पुस्तकी शब्द वापरुन मध्येच त्याला इंग्रजीचा तडका देऊन मीडियाला बाईट देताना हे नाटकी बोलणारे काही स्टार पाहिल्यावर हसावं की रडावे असं झालं माझं.”

Jhund Day 3 : नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाच्या कमाईमध्ये दुपटीने वाढ, कमावले इतके कोटी

पुढे या विषयी बोलताना महेश म्हणाले, “आपल्याच ग्रुप, कंपू मधील कलाकार, दिग्दर्शकांच्या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर स्वतः च्या इन्स्टाग्राम, फेसबुकवर शेअर करणारे हे काही कलाकार एखाद्या नवीन किंवा ग्रुप बाहेरील कलाकार, दिग्दर्शकाचे पोस्टर ट्रेलर शेअर करायला हात आखडता का घेतात? स्वतःचे ग्रुप सोडून बाहेरील कुणाच्या चित्रपटावर, अभिनयावर बोलताना तोंडं का बंद होतात यांची??? मराठी म्हणून अभिमानानं मराठी भाषा दिनानिमित्त इन्स्टाग्राम, फेसबुकवर फोटो पोस्ट करणारे हे काही स्टार कलाकार आपापले ग्रुप सोडून इतरांचे मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन का पाहत नाहीत? का आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट?” तर ही पोस्ट चित्रपटसृष्टीतील सर्वच कलाकारांच्या बाबतीत नाही असे ही त्यांनी यात सांगितले आहे.

महेश टिळेकर या पोस्ट विषयी म्हणाले…

“मी लिहिलेली पोस्ट आणि त्यात मांडलेले माझे मत हे ‘झुंड’ चित्रपटाच्या विरोधात नाही. तरीही काहींनी पोस्ट समजून न घेता मी ‘झुंड’ चित्रपटाच्या विरोधात आहे, असा गैरसमज करून घेतला आहे. मराठी चित्रपसृष्टीतील काही स्टार कलाकारांचे ग्रुप आहेत. जे त्यांच्या ग्रुप मधील कलाकार,दिग्दर्शक सोडले तर, इतर काही कलाकार, दिग्दर्शकांचे कधी कौतुक करत नाहीत, म्हणून मी त्या कलाकारांवर टीका केली आहे.”