scorecardresearch

या तारखेला ‘माझा अगडबम’ सिनेमा रसिकांच्या भेटीला

सुपरहिट ‘अगडबम’ चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा झाल्यापासून, चाहते उत्सुकतेने या भागाच्या प्रतिक्षेत आहेत.

या तारखेला ‘माझा अगडबम’ सिनेमा रसिकांच्या भेटीला
‘माझा अगडबम’

‘सिनेमंत्र’ प्रॉडक्शनने नुकतीच ‘सम्राज टॉकीज’ या नव्या उद्यमाची घोषणा केली आहे. मनोरंजन, सर्जनशीलता आणि कला यांसारख्या क्षेत्रात मराठी साहित्याचे दर्जेदार प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे सम्राज टॉकीजचे मूळ उद्दीष्ट असून, त्या दिशेने पहिले पाऊल उचलत सिनेमंत्र आणि सम्राज टॉकीज, ६ जुलै २०१८ रोजी ‘माझा अगडबम’ हा मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित करीत आहेत.

रितेश देशमुखच्या ‘लई भारी’ सारखी दमदार व उत्तम कलाकृती देणाऱ्या, शालिनी ठाकरे यांनी आपले नवे उद्यम ‘सम्राज टॉकीज’ विषयी बोलताना सांगितले, ‘सम्राज टॉकीजमागील मूळ कल्पना ही दर्जेदार मराठी साहित्याला प्रोत्साहन देणे आहे जे उत्तम प्रकाशना-अभावी हरवत चालले आहे. प्रेक्षकांमध्ये अशा प्रदर्शित कलाकृतींबाबत जागरूकता निर्माण करणे हाच सम्राज टॉकीज मागील अनोखा विचार आहे.’
सुपरहिट ‘अगडबम’ चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा झाल्यापासून, चाहते उत्सुकतेने या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. गृहिणीची भूमिका साकारत तृप्ती भोईर व तिच्या पतीची भूमिकेत सुबोध भावे, या चित्रपटातून प्रेक्षकांना एका सुखद आणि भावनिक सफरीचा अनुभव देतील.
ही कथा आपणास एक मुलगी, सून, व बायको म्हणून तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षांना पतीच्या पाठींब्यासह सामोरी जाणाऱ्या नायिकेच्या विविध अडचणी आणि विनोदाची सफर घडविते. एका अलौकिक विनोदाची झालर असणारी ही कथा दिग्दर्शिका तृप्ती भोईर या चित्रपटातून मांडत आहेत.

Video : ६६ कलाकार, ४३ गाण्यांच्या ‘हा’ भन्नाट व्हिडिओ पाहिलात का?

२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अगडबम’ या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीत उल्लेखनीय यश उमटवले होते. आणि आता पुन्हा एकदा दमदार अभिनय व वैचारिक कथानकसह ‘माझा अगडबम‘ प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी सज्ज झाला आहे.

‘माझा अगडबम ‘ चित्रपटात तृप्ती भोईर, सुबोध भावे, उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर, तानाजी गलगुंडे आणि डॉ. विलास उझवणे अशा दमदार कलाकारांची फळी असून खुद्द तृप्ती भोईर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तृप्ती भोईर फिल्म्स, सिनेमंत्र आणि सम्राज टॉकीज निर्मित ‘माझा अगडबम‘ ६ जुलै, २०१८ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-05-2018 at 17:43 IST

संबंधित बातम्या