scorecardresearch

शिक्षण व्यवस्थेकर भाष्य करणारा ‘कॉपी’; गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त संपन्न

‘कॉपी’च्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा चर्चेत येईल.

शैक्षणिक व्यवस्थेकर भाष्य करणा‍ऱ्या ‘कॉपी’ चित्रपटाचा मुंबईमधील जुहूयेथील ऑडिओ गॅरेज स्टुडिओत गीत ध्वनीमुद्रणाने संपन्न झाला. यावेळी गायक प्रविण दोणे यांनी गायलेलं ‘चालला चालला जीक पांघरूनिया…’ हे गाणे रेकॉर्ड करण्यात आलं. राहुल साळवे यांनी लिहिलेल्या या गीताला रोहन प्रधान-रोहन गोखले (रोहन-रोहन) या संगीतकार जोडीने संगीत दिलं आहे. या प्रसंगी दिग्दर्शक-अभिनेते विजय पाटकर चित्रपटातील कलाकार अंशुमन विचारे, जगन्नाथ निकंगुणे, विपुल साळुंखे तसंच अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती.

‘कॉपी’ हा चित्रपट समाजातील शिक्षण व्यवस्थेकर भाष्य करणारा आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा चर्चेला येणार यात शंका नाही. चित्रपट समाजातील विशेषत: ग्रामीण भागात झालेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणाला वाचा फोडणारा आहे. विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे तेथील शिक्षकांची मानसिकता बदलली आहे. त्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्याकर होत आहे. शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मानसिकतेचा आढावा ‘कॉपी’ या चित्रपटाच्या निमित्ताने घेण्यात येणार असल्याचे चित्रपटाच्या दिग्दर्शक जोडीने सांगितले.

आज समाजात जे घडतंय ते दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला जाणार असल्याचं सांगत, या निमित्ताने शिक्षण व्यवस्थेत होणारा काळा बाजारही उजेडात येईल यात शंका नाही. चित्रपट हे समाज व्यवस्थेकर भाष्य करण्याचं उत्तम माध्यम असल्याने ‘कॉपी’मध्ये हा विषय मांडण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

गणेश रामचंद्र पाटील यांची संकल्पना असलेल्या या चित्रपटाची कथा हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे यांनी राहुल साळके यांच्या साथीने लिहिली आहे. तर पटकथालेखन हेमंत-दयासागर यांनीच केलं आहे. दयासागर यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. कोरिओग्राफर रॉकी हारळे चित्रपटातील गीतांसाठी कोरिओग्राफी करणार आहेत. ‘श्री महालक्ष्मी किकएशन्स’ची प्रस्तुती आणि गणेश पाटील व शंकर म्हात्रे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात मिलिंद शिंदे, विपुल साळुंखे, अनिल नगरकर, कैलास वाघमारे, राहुल बेलापूरकर, पूनम वाघमारे, सौरभ सुतार आणि प्रवीण कापडे या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi movie copy muhurt

ताज्या बातम्या