ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाच्या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वरद हा सध्या आई मायेचं कवच या मालिकेत भास्कर नावाचे पात्र साकारत आहे. त्याच्या या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. नुकतंच कलर्स मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात त्याला‘लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर वरदने वडिलांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलर्स मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात वरद चव्हाणला ‘लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा’ हा पुरस्कार मिळाला. आई मायेचं कवच या मालिकेत साकारलेल्या भास्करच्या भूमिकेसाठी त्याला गौरविण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर वरदने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने सर्वांचे आभार मानताचा एक व्हिडीओ ही शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाला.

वरद चव्हाणची इन्स्टाग्राम पोस्ट

दहा-बारा वर्षांच्या खडतर प्रवासानंतर मिळालेली ही पहिली पोचपावती….आज खरंच बाबा हवे होते…पण त्यांनी हा क्षण पहिला असेल ह्याची पूर्ण खात्री आहे मला…त्याच बरोबर माझ्या कारकीर्दतली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजेचच विराज राजे सर ह्याचे खूप खूप आभार….त्याच बरोबर कोठारे व्हिजन, महेश कोठारे सर ह्यांचे सुद्धा आभार…

मागील २ वर्ष आपल्या सगळ्यांचेच वाईट गेलेत…ह्या २ वर्षात माझ्या पाठीशी खंबीर पणे उभी राहणी बायको प्रज्ञा चव्हाण आणि आई विभावरी चव्हाण खरंच थँक्स ….. आई मायेचा कवचची संपूर्ण टीम खास करून भार्गवी चिरमुले, सचिन देशपांडे…खूप खूप धन्यवाद. सगळ्यात शेवटचा सर्व रसिकप्रेक्षकांचे खूप आभार. असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम असू दे, असे वरद चव्हाणने म्हटले आहे.

वरद चव्हाणने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. तसेच त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत असल्याचेही दिसत आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतर सलमानने केला अनुपम खेर यांना फोन, म्हणाला “मला…”

दरम्यान अभिनेता वरद चव्हाण हा ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा आहे. वरद विजय चव्हाण त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. मराठी विविध नाटकांमध्ये काम करत असताना त्याने मालिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. सध्या वरद हा कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘आई मायेचे कवच’ या मालिकेमध्ये पोलीस निरीक्षक ‘भास्कर लोखंडे’ नावाची भूमिका साकारताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi veteran actor vijay chavan son varad share emotional post on instagram nrp
First published on: 28-03-2022 at 15:05 IST