‘थप्पड’ चित्रपटातील आपल्या अभिनय कौशल्यामुळे सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे माया साराओ. मायाने आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता माया ‘ए थर्सडे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील मायाचा लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आल आहे.
मायाचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. मायाचा हा फोटो आरव्हिपीमूव्हिजने शेअर केला आहे. माया टेलीव्हिजनवर लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. मायाने गुलाबी रंगाचा शर्ट आणि ब्लेजर परिधान केले आहे. मायाचे शार्ट हेअर दिसत आहेत. तिच्या चेहऱ्यावर असलेले गंभीर हावभाव तिच्या भूमिकेतील गंभीरपणा दाखवत आहे. “नॅशनल टेलिव्हिजनवर लाइव्ह रिपोर्टिंग करते, एका चुकीमुळे तिचे सर्व काही जाऊ शकते हे तिला माहित आहे. धैर्यवान आणि निर्भय माया बातम्या देताना दिसणार आहे. जे काही #AThursday” हे हॅशटॅग देखील वापरले आहे. हा चित्रपट गुरूवारी घडणाऱ्या अकल्पनीय गोष्टींवर आधारित आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात एका बुद्धिमान प्ले स्कूल टीचर, नैना जयसवालची गोष्ट सांगण्यात आली आहे. नैनाची भूमिका यामी गौतम साकारत आहे आणि ती १६ मुलांचे अपहरण करते असे दाखवण्यात येणार आहे. पहिल्यांदाच यामी अशी भूमिका साकारणार आहे. तर नेहा धुपिया या चित्रपटात एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. एवढंच नाही तर डिंपल कपाडिया आणि अतुल कुरकर्णी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला आरएसवीपीच्या अंतर्गत करणार आहे. हा चित्रपट २०२१मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.