प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ या राजकीय व्यंगचित्र असणाऱ्या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २९ जुलैपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रूचिता जाधव, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेलरमधील जबरदस्त संवाद, विनोदी किस्से प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे आहेत. राजकारणातील अस्पष्ट बाजूचे व्यंगात्मक चित्रण पहिल्यांदाच मराठी सीरीजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न ‘मी पुन्हा येईन’मधून करण्यात आला आहे. प्रत्येक क्षणी डोळ्यांत अंजन टाकणारी, विचार करण्यास भाग पाडणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांचे मनोरंजनही करणारी आहे. राजकारणातील नाटकाभोवती फिरणाऱ्या या कथानकात कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीने, विनोदाची अचूक वेळ साधत अधिकच रंगत आणली आहे.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “आम्ही नेहमीच आमच्या ओटीटीवर उत्तमोत्तम आणि नवीन आशय देण्याच्या प्रयत्न केला आहोत. ‘मी पुन्हा येईन’ ही मराठी वेबविश्वासाठी एक वेगळी संकल्पना आहे आणि मला या गोष्टींचा विशेष आनंद आहे की, ही मनोरंजनात्मक सीरीज प्रेक्षकांना प्लॅनेट मराठीवर पाहाता येणार आहे.”

आणखी वाचा- “जोडीदाराकडून अपेक्षा…” सुश्मिताच्या अफेअरनंतर एक्स बॉयफ्रेंड रोहमनचा व्हिडीओ व्हायरल

‘मी पुन्हा येईन’ बद्दल लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, “प्रेक्षकांची प्रतिक्रिया ही सर्वोत्तम प्रतिक्रिया असते. आता ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात, हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. बहुमतासाठी पक्षाची चाललेली धडपड, आमदारांची पळवापळवी, कारस्थाने सत्तेसाठी कोणत्या थराला जातात, याचे गंमतीशीर चित्रण ‘मी पुन्हा येईन’मध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणाचे काही खरे नाही, हेच खरे आहे, हे हसतखेळत सांगणारी ही सीरीज आहे. मला खात्री आहे, हे कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईलच याशिवाय यातील मनोरंजक ट्विस्ट्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतील.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Me punha yein trailer release today akshay bardapurkar arvind jagtap upendra limaye sayaji shinde mrj
First published on: 21-07-2022 at 13:03 IST