ब्रेकअपनंतर मी अनेक महिलांसोबत सेक्स केला आणि त्यामुळे…; प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा

पण तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी फार मोठ्या प्रमाणात महिलांसोबत सेक्युअल रिलेशन ठेवण्यास सुरुवात केली.

हॉलिवूडचा प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेता विल स्मिथचे जगभरात लाखो चाहते आहेत. मेन इन ब्लॅक, अली आणि इंडिपेंडेस डे यासारख्या अनेक चित्रपटात त्याने दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ सध्या त्याच्या बायोग्राफीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. विल स्मिथने त्याच्या बायोग्राफीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. यामुळे अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. माझे माझ्या पहिल्या प्रेयसीसोबत ब्रेकअप झाला होता. त्यानंतर मी अनेक महिलांसोबत शारिरिक संबंध ठेवला होता. यामुळे मी आजारी पडलो होतो, असा खुलासा त्याने केला आहे.

विल स्मिथच्या बायोग्राफीचे नाव ‘विल’ असे आहे. यात विलने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अनुभव शेअर केले आहेत. यात त्याने त्याच्या पूर्वाश्रमीच्या गर्लफ्रेंडबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. “माझ्या एक्स गर्लफ्रेंडचे नाव मेलानी असे होते. मी १६ वर्षांचा असताना मला मेलानी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो. पण तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी फार मोठ्या प्रमाणात महिलांसोबत शारिरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. यावर मात करण्यासाठी मी होमिओपॅथिक उपायांचा अवलंब केला. खूप खरेदी केली,” असे तो म्हणाला.

हेही वाचा : ‘घटस्फोटीत महिलांना देखील फिजिकल…’, लारा दत्ताचे वक्तव्य चर्चेत

यानंतर पुढे विल स्मिथने म्हणाला, “त्याने त्याच्या आयुष्यात मेलानीशिवाय फक्त एका महिलेशी शारिरिक संबंध ठेवले होते. पण गर्लफ्रेंडने त्याची फसवणूक केल्याचे कळताच त्याने तिच्याशी सर्व संबंध तोडले. विल स्मिथने त्याच्या बायोग्राफीत म्हटले की जेव्हा मी दोन आठवड्यांच्या संगीत टूरसाठी बाहेर गेलो होता, तेव्हा तिने माझी फसवणूक केली. पण त्यानंतर विल स्मिथने खूप सेक्स केला. त्याने इतक्या महिलांसोबत शाररिक संबंध ठेवले की तो आजारी पडला,” असे त्याने सांगितले.

हेही वाचा : ‘कॅज्युअल सेक्स’बद्दल प्रतीक बब्बर म्हणतो, “मला यात काही चुकीच वाटतं नाही, मी सुद्धा…”

“मला ब्रेकअप सहन होत नव्हते. त्यामुळे त्यानंतर पुढचे काही महिने मी अनेक महिलांसोबत सेक्स केला. यामुळे मला psychosomatic नावाचा आजार जडला. यामुळे कधी कधी मला उलट्याही व्हायच्या. मात्र अजूनही मला या गोष्टींचे दु:ख आहे की, मी अनेक महिलांशी शारिरिक संबंध ठेवून मला अपेक्षित जोडीदार मिळाला नाही. मी त्या प्रत्येक महिलेमध्ये माझ्यावर प्रेम करणारी, मला दु:ख विसरायला लावणारी व्यक्ती आहे का? हे सतत शोधायचो, असे तो म्हणाला.

विल स्मिथने १९९२ मध्ये अभिनेत्री शेरी झम्पिनो लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा आहे. मात्र १९९५ मध्ये ते दोघे विभक्त झाले. घटस्फोटानंतर दोन वर्षांनी १९९७ मध्ये विल स्मिथने अभिनेत्री जदा कोरेन पिंकेट हिच्या विवाह केला. त्यांची पहिली ओळख ‘The Fresh Prince of Bel-Air’ या चित्रपटादरम्यान झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Men in black actor will smith reveals he fell ill due to sexual intercourse with many women after break up nrp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या