Metro In Dino Box Office Collection Day 7 : ‘मेट्रो इन दिनों’ हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपट होता. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (४ जुलै) तो चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रदर्शित झाल्यावर एक आठवडा पूर्ण झाल्यानंतर तो ३० कोटी रुपयेही कमावू शकला नाही. ‘मेट्रो इन दिनों’ने प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी म्हणजे पहिल्या गुरुवारी किती कमाई केली ते जाणून घेऊया?
‘मेट्रो इन दिनों’ने ७ व्या दिवशी किती कमाई केली?
२००७ च्या कल्ट-क्लासिक ‘लाइफ इन अ मेट्रो’चा स्पिरिच्युअल सीक्वेल, ‘मेट्रो इन दिनों’ अनुराग बासू दिग्दर्शित चित्रपट आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट आता दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करणार आहे. बॉक्स ऑफिसवर तो अपेक्षेइतकी कमाई करू शकलेला नाही; पण त्याने पहिल्या आठवड्यातच ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या कमाईला मागे टाकले.
चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, ‘मेट्रो इन दिनों’ने ३.५ कोटी रुपयांसह आपले खाते उघडले आणि दुसऱ्या दिवशी सहा कोटी व तिसऱ्या दिवशी ७.२५ कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी चित्रपटाने २.५ कोटी व पाचव्या दिवशी तीन कोटींची कमाई केली. सहाव्या दिवशी त्याची कमाई २.३५ कोटी होती. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘मेट्रो इन दिनों’ने रिलीजच्या सातव्या दिवशी २.१५ कोटींची कमाई केली आहे.
‘मेट्रो इन दिनों’मध्ये सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता, अनुपम खेर, अली फजल व फातिमा सना शेख यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आठ स्टार्सचे स्टारडम असूनही या चित्रपटाला काही फायदा झाला नाही आणि तो बॉक्स ऑफिसवर चांगला कामगिरी करू शकला नाही. निराशाजनक गोष्ट म्हणजे ८५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट रिलीजच्या एका आठवड्यात ३० कोटीही कमवू शकला नाही. त्यामुळे त्याचे अर्धे बजेट तर सोडाच. चित्रपटाचा खर्च वसूल करणेही कठीण वाटत आहे.
असो, या चित्रपटाशी स्पर्धा करण्यासाठी, राजकुमार रावचा ‘मालिक’ व विक्रांत मेस्सीचा ‘आंखों की गुस्ताखियां’ हे चित्रपटदेखील आज (११ जुलै) प्रदर्शित होत आहेत. इतकेच नाही तर ‘सितारे जमीन पर’, ‘माँ’, ‘एफ१’ व ‘जुरासिक वर्ल्ड रिबर्थ’ हे चित्रपट आधीच थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. अशा परिस्थितीत दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट कसा कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.