Metro In Dino Ott Release Announcement : अनुराग बसू यांचा रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘मेट्रो इन दिनों’ ४ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकला नसाल, तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
हा बॉलीवूड रोमँटिक ड्रामा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, सारा अली खान, आदित्य रॉय कपूर यांसारखे स्टार्स दिसले होते.
‘मेट्रो इन दिनों’ कधी आणि कुठे प्रदर्शित होईल?
‘मेट्रो इन दिनों’ २९ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. रिपोर्टसनुसार, या चित्रपटाने भारतात ५५.१६ कोटींची कमाई केली होती. त्याच वेळी या चित्रपटाने जगभरात सुमारे ६५.०८ कोटींची कमाई केली होती.
या चित्रपटात हे कलाकार दिसले होते
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले होते. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, नीना गुप्ता, अली फजल, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख व कोंकणा सेन शर्मा हे चित्रपटात दिसले होते. कोंकणा सेन शर्मादेखील ‘लाइफ इन अ मेट्रो’चा एक भाग होती.
हा चित्रपट प्रेमाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत असलेल्या चार जोडप्यांची कहाणी दाखवतो. सर्व जोडप्यांचे वेगवेगळे संघर्ष दाखवले आहेत. मेट्रो इन दिनों हा २००७ मध्ये आलेल्या ‘लाइफ इन अ मेट्रो’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. जर तुम्हाला ‘लाइफ इन अ मेट्रो’ आवडला असेल, तर तुम्हाला अनुराग बासूचा हा चित्रपटदेखील आवडेल.
तब्बल १८ वर्षांनंतर ४ जुलै २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ‘मेट्रो इन दिनों’ हा चित्रपट आला. या चित्रपटावर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव झाला. अनेक जण ‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करीत होते. अखेर हा चित्रपट २९ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळाली. या चित्रपटासाठी अभिनेता आदित्य रॉय कपूरला सर्वाधिक मानधन मिळाल्याचं समजतंय. चित्रपटातील पार्थ या भूमिकेसाठी आदित्यला जवळपास पाच ते सहा कोटी रुपये मानधन मिळालं आहे. त्यानंतर अभिनेत्री सारा अली खानला तीन कोटी रुपये मानधन मिळालं आहे.