प्रसिद्ध उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पतीराज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली. राज पॉर्न फिल्म निर्मिती रॅकेटचा प्रमुख सुत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अटकेपूर्वी मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलकडून राज कुंद्राची सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. राजच्या अटकेनंतर बॉलिवूडमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी राजवर टीका केली आहे तर काहींनी राजला पाठिंबा दिला आहे. आता बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायक मिका सिंगने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने मिका सिंगचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मिका सिंग बोलताना दिसत आहे की, ‘काय होतय हे पाहूया. जे काही होणार ते चांगलेच होणार. मला त्याच्या अ‍ॅपविषयी फार काही माहिती नाही. मी ते अ‍ॅप पाहिले होते. ते एकदम सिंपल अ‍ॅप होते. त्या अ‍ॅपमध्ये फारकाही नव्हते. त्यामुळे जे काही होईल ते चांगले होईल अशी अशा करुया. माझ्या माहितीप्रमाणे राज कुंद्रा खूप चांगला व्यक्ती आहे. काय खरं आणि काय खोटं आहे हे कोर्टच आपल्याला सांगू शकते.’

आणखी वाचा : ‘अ‍ॅपसाठी त्याने मला…’, राज कुंद्राच्या अटेकनंतर यूट्यूबरचा गौप्यस्फोट

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मिका सिंग पूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, राखी सावंत, गहना वशिष्ठ, पूनम पांडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. काही बॉलिवूड कलाकारांनी राजला पाठिंबा दिला आहे तर काहींनी त्याला सुनावले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.