देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून अभिनेता मिलिंद सोमण ओळखला जातो. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा मिलिंद आज फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. सध्या मिलिंद हा नवीन वर्षाच्या निमित्ताने पत्नी अंकिता कोनवारसोबत राजस्थानमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. त्या दोघांचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मिलिंद सोमण हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. नुकतंच त्याने त्याचा आणि अंकिताचे दोन रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ते दोघेही छान रोमँटिक पोझ देताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मिलिंद सोमणने हे फोटो पोस्ट करताना सोबत छान कॅप्शनही दिले आहे.
“फारच छान!! जैसलमेर खूप मजेशीर होते आणि कदाचित सर्वात रोमँटिक ठिकाणांपैकी एक. खेळती हवा, आरामदायक खोल्या, वाळवंटातील सूर्य आणि रात्रीचे बोनफायर…पुन्हा पुन्हा आम्हाला याची आठवण करुन देतील. लवकरच भेटू जैसलमेर!!!,” असे कॅप्शन मिलिंदने या फोटोंना दिले आहे.
तर दुसरीकडे अंकितानेही हे फोटो शेअर केले आहेत. “प्रेमाच्या बाहूंमध्ये. स्वर्ग फक्त एक हृदयाचा ठोका दूर आहे,” असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
दरम्यान या दोघांचे हे फोटो प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. तसेच नवीन वर्षाची सुरुवात कशाप्रकारे संगीताच्या मदतीने केली याचाही एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओत अंकिता ही नाश्ता करता करता मिलिंद सोमणसाठी गाणं गात गिटार वाजवताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.