‘मिस केरळ २०१९’ ही स्पर्धा जिंकणारी अनसी काबीर आणि उपविजेती डॉ. अंजना शाहजान या दोघींचा महिनाभरापूर्वी अपघात झाला. या अपघातात दोन्ही सौंदर्यवतींचा मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या दोघींचा मृत्यू अपघातात झाल्याचे बोललं जात होते. मात्र आता पोलीस तपास अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यानुसार, एक ड्रग्ज विक्रेता या दोघींच्या गाडीचा पाठलाग करत होता. यामुळे त्या चालकाने वेगाने गाडी चालवल्याने अपघात झाल्याचा नवा खुलासा समोर आला आहे.

गेल्या ३१ ऑक्टोबरला रात्री १.३० च्या सुमारास मॉडेल अनसी कबीर आणि अंजना या दोघींचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. या दोघांचाही रस्ते अपघात मृत्यू झाला, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता त्या दोघींच्या गाडीचा कोणीतरी पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे.

केरळमधील एर्नाकुलम शहराचे पोलीस आयुक्त सीएच नागराजू यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, “संशयित ड्रग्ज तस्कर सैजू थंकाचन या व्यक्तीने त्यांच्या कारचा पाठलाग करत होता. यादरम्यान गाडीचा अपघात झाला आणि त्यात त्या दोघींचा मृत्यू झाला, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. अनसी कबीर आणि अंजना शाजन यांच्या कारचा पाठलाग करत असताना त्यांची गाडी एका डिव्हाईडवर आदळली. यामुळे मॉडेलचा मृत्यू झाला.”

नागराजू यांच्यामते, “सैजू हा ड्रग अॅडिक्ट आहे. सैजूने यापूर्वीही अनेक महिलांचे शोषण केले आहे. सैजूने चुकीच्या उद्देशाने त्या दोघींचा पाठलाग केला. त्यानंतर त्या दोघींचा अपघात झाला. सैजूने मॉडेलला थांबण्यास सांगितले होते. मात्र तिने नकार दिल्यावर त्याने कारचा पाठलाग सुरु केला.”

तर दुसरीकडे सैजूच्या मते, “अब्दुल रहमान हा दारूच्या नशेत असल्याने त्याला गाडी चालवण्यापासून मला रोखायचे होते. त्यामुळेच तो गाडीचा पाठलाग करत होता. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सैजूची ऑडी कार जप्त केली. त्याच्या कारमध्ये कंडोम आणि काही औषधे सापडली. त्याच्या फोनमध्ये अनेक मुलींचे फोटो होते,” असेही पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अनसी काबीर आणि डॉ.अंजना शाहजान या गाडी चालवत असताना, त्यांच्या समोर आलेल्या एका दुचाकीला चुकवण्याच्या नादात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघाताच्या वेळी गाडीमध्ये त्यांच्यासोबत इतर दोन जणंही प्रवास करत होते. या दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्रीनंतर तिरुवनंतपुरम मधील एका रस्त्यावर हा अपघात घडला. अचानक समोर आलेल्या दुचाकीला होणारी धडक टाळण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. यामध्ये गाडीतील दोघी जागीच ठार झाल्या तर इतर दोघे गंभीर जखमी झालेत.