अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. नुकतच स्वराने एक ट्वीट करत हिंदुत्ववाद्यांची तुलना तालिबानशी केली होती. यानंतर संतप्त नेटकऱ्यांनी स्वरा भास्करवर निशाणा साधत स्वराला अटक करण्याची मागणी केली. सोशल मीडियावर #ArrestSwaraBhasker हा ट्रेंड व्हायरल झाला होता. हिंदुत्ववाद्यांची तुलना तालिबानशी करणारं ट्वीट आता स्वराला महागात पडण्याची शक्यता आहे. कारण देशभरात विविध ठिकाणी स्वरावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

स्वराच्या या वादग्रस्त ट्वीटनंतर देशभरात विविध ठिकणी स्वरा भास्करविरोधात जवळपास १४ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. दिल्लीमध्ये वकिल असलेल्या अशोक चैतन्य यांनी स्वरा भास्कर विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर आसाममधील हतिगांव पोलीस स्टेशनमध्ये स्वराविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: अफगाणी असल्याने ‘या’ अभिनेत्रीला व्हावं लागलं होतं ट्रोल; सलमान खानने केलं होतं लॉन्च

तसचं हिंदू आयटी सेलच्या वतीने गुजरातमध्ये देखील स्वरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंदू धर्मासाठी ही संघटना कार्यरत असून विकास पांडे आणि रमेश सोलंकी यांनी या संघटनेची स्थापना केली आहे. हिंदू धर्माविषयी अपशब्द सहन केला जाणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी स्वरा भास्कर विरोधात तक्रार दाखल केलीय. तसचं कलकत्ता सायबर सेलमध्ये देखील हिंदूंच्या भावना दुखवल्याने स्वरा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: “अफगाणिस्तानात जन्म झाला असला तरी मी भारतीयच”; नागरिकत्वावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं उत्तर

काय म्हणाली होती स्वरा?

“एकीकडे तालिबानी दहशतवादामुळे आपल्याला धक्का बसतो आणि दुसरीकडे हिंदुत्ववादी दहशतवाद आपण खपवून घेतो. आपण तालिबानी दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त करुन दुसरीकडे हिंदुत्ववादी दहशतवादाकडे दुर्लक्ष करु शकत नाही. अत्याचार होणाऱ्या आणि करणाऱ्याची ओळख काय आहे यावर आपली मानवी मुल्यांची व्याख्या आधारित असता कामे नये.” असे ट्वीट स्वराने केले होते.