वाढत्या लॉकडाउनमुळे चित्रपटसृष्टी पूर्णपणे ठप्प पडली आहे. निर्मात्यांना, कलाकारांना, कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. सिनेमागृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यास निर्बंध असल्यामुळे निर्मात्यांनी आता OTT प्लॅटफॉर्मचा मार्ग निवडला आहे. या पर्यायामुळे सिनेमागृहांचे मालक मात्र नाराज आहेत. या प्रकरणावर दाक्षिणात्य सुपरस्टार राणा डग्गुबती याने प्रतिक्रिया दिली आहे. “प्रेक्षकांना OTTवरुन सिनेमागृहाकडे पुन्हा खेचण्यासाठी अॅव्हेंजर्स सारखा चित्रपट तयार करायला हवा अन्यथा काही खरं नाही”
अवश्य पाहा – “विराट कोहली टर्किश शोमध्ये काय करतोय”; हे दृश्य पाहून आमिरला पडला प्रश्न
नेमकं काय म्हणाला राणा?
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत राणा म्हणाला, “लॉकडाउनच्या काळात प्रेक्षक OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपटांचा आनंद घेत आहेत. लॉकडाउन संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात करोनाबाबत भीती कायम राहील. त्यामुळे त्यांना सिनेमागृहांकडे वळवणं कठीण आहे. त्यासाठी ‘स्टार वॉर्स’ किंवा ‘अॅव्हेंजर्स’ सारखा एकदा मोठा स्पेशल इफेक्टने भरलेला चित्रपट तयार करावा लागेल. कारण असे चित्रपट प्रेक्षकांना वेड लावतात. असे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक वेड्यासारखे सिनेमागृहांमध्ये जातात. निर्मात्यांशी भांडून सिनेमागृहांच्या मालकांना काहीही मिळणार नाही. कारण सध्या आर्थिक संकटाचा सामना सर्वच क्षेत्रातील लोक करत आहेत.”
अवश्य पाहा – राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात पॉर्नस्टार; हा पाहा चित्रपटाचा टीझर
अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट थिएटरऐवजी आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आयनॉक्सने एक पत्रक जारी करुन आपला संताप व्यक्त केला होता. या पत्रकामुळे चित्रपट निर्माते विरुद्ध सिनेमागृहांचे मालक अशा एका नव्या वादाची निर्मिती झाली. या पार्श्वभूमीवर राणाने पिंकविलाला ही प्रतिक्रिया दिली होती.
