Dhanush Mrunal Thakur Dating Rumors : साऊथचा सुपरस्टार अभिनेता धनुष याचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘रांझणा’ चित्रपटानंतर त्याचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला. ऐश्वर्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर तो पहिल्यांदाच त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय.
घटस्फोटानंतर धनुष एका मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जातय. त्या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होतोय.
अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचे नाव सुपरस्टार धनुषशी जोडले जात आहे. धनुष आणि मृणाल ठाकूर एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.अलीकडेच दोघांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही एकमेकांचे हात धरून असल्याचे दिसून आले. त्यांचे नाते काही काळापूर्वीच सुरू झाले आहे. दोघांनीही अद्याप या नात्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघांनाही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलं, त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या.
अभिनेता धनुषने नुकतीच मृणाल ठाकूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती आणि आता त्या पार्टीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये धनुष मृणाल ठाकूरचा हात धरून बोलताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.
मृणाल काही काळापूर्वी नजरबद्दल बोलली होती. तिने इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत नजरच्या संकल्पनेवर प्रतिक्रिया दिली होती. अभिनेत्री म्हणाली होती, “माझ्या करिअरमध्ये अजूनही खूप गोष्टी करायच्या आहेत. असे बरेच बॉक्स आहेत, जे मी अजून तपासलेले नाहीत. मी ते पूर्ण केल्यावर त्याबद्दल बोलेन; कारण मला असं वाटतं नजर नाही लागावी, खूप जास्त नजर लागते.”
पुढे मृणालने मुलाखतीत सांगितले की, प्रसिद्धी सांभाळताना ती वैयक्तिक मर्यादा कशा राखते. मृणाल म्हणाली, “स्वतःबद्दल काहीही बोलण्यापूर्वी कोणीही विचार केला पाहिजे, या अर्थाने माझे व्यक्तिमत्व खूप वेगळे आहे. कोणीतरी पुढच्या वर्षी किती चित्रपट प्रदर्शित करायचे आहेत याबद्दल बोलू शकते, मी त्याबद्दल बोलत नाही. सर्वांना माहीत आहे की काय येणार आहे आणि काय नाही. मी सतत विचार करत नाही आणि त्याबद्दल बोलत नाही. लोक मला माझ्या कामाबद्दल विचारतात. ते विचारतात की मी या दबावाला कसे सामोरे जाते; पण मला दबाव जाणवत नाही, मी खूप सकारात्मक व्यक्ती आहे.”
Dhanush and Mrunal Thakur are dating? pic.twitter.com/ItWYJdsm8a
— Aryan (@Pokeamole_) August 3, 2025
यापूर्वी ३ जुलै रोजी धनुषच्या ‘तेरे इश्क में’ सिनेमाच्या पार्टीत मृणाल ठाकूर दिसली होती, जी लेखिका आणि निर्माती कनिका ढिल्लन यांनी आयोजित केली होती. कनिकाने नंतर काही फोटो शेअर केले ज्यामध्ये ती, मृणाल ठाकूर आणि धनुष एकत्र पोज देताना दिसले. पण, तेव्हादेखील दोघांनी नात्यावर वक्तव्य केलं नाही. मृणाल ठाकूर अविवाहित आणि सिंगल असली तरी तिचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं आहे. यामध्ये बादशाह, सिद्धांत चतुर्वेदी, कुशल टंडन, अर्जित तनेजा आणि शरद त्रिपाठी यांचा समावेश आहे. अभिनेत्रीने छोट्या पडद्यापासून प्रवास सुरू केला आहे; ती बॉलीवूडचीदेखील मोठी स्टार आहे.
धनुषबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्याने रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याबरोबर लग्न केलं. पण, त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. १८ वर्षांच्या लग्नानंतर धनुष आणि ऐश्वर्या यांनी २०२२ मध्ये विभक्त होण्याची घोषणा केली. यानंतर एप्रिल २०२४ मध्ये धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट झाला, त्यांना दोन मुले आहेत.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर मृणाल सध्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटात दिसली आहे. धनुष आता क्रिती सेनॉन स्टारर ‘तेरे इश्क में’ सिनेमात दिसणार आहे आणि हा सिनेमा २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.