बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट्स, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी बिग बी क्रिकेटपटूंच्या मुलींमुळे चर्चेत आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटपटूंच्या मुलींची एक यादी ट्विट केली आहे. मात्र ही यादी पाहून काही नेटकरी संतापले अन् त्यांनी घराणेशाहीचे आरोप करत बिग बींना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. त्यामुळे बिग बींनी आपल्या अनोख्या शैलीत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या मुलींची एक यादी ट्विट केली. ही आहे महिलांची टीम असं म्हणत त्यांनी महेंद्र सिंह धोनीच्या मुलीला त्या टीमचा कर्णधार म्हणून घोषीत केलं. मात्र गंमत म्हणून केलेलं हे ट्विट पाहून काही नेटकरी संतापले आहेत. “अमिताभ तुम्ही इथे देखील घराणेशाही चालवणार का?, क्रिकेटला तरी घराणेशाहीपासून दूर ठेवा.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत त्यांना ट्रोल केलं जात आहे.

दरम्यान, अमिताभ महिला संघाच्या भविष्याबाबत बोलत असले तरी सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंची परिस्थिती बिकट आहे. भारताने मालिकेच्या सुरूवातीला दोन-तीन खेळाडूंना दुखापतीमुळे संघाबाहेर केल असताना आता चौथ्या कसोटीआधी सहा ते सात खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या कसोटीत भारतीय संघ कोणत्या खेळाडूंसोबत मैदानात उतरतो हे पाहणे औत्स्युक्याचं असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni daughter women cricket team captain amitabh bachchan troll mppg
First published on: 14-01-2021 at 11:57 IST