भारताचे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी आणि नीता अंबानींची धाकटी सून एका संगीत सोहळ्यामध्ये जबरदस्त डान्स करताना दिसली होती. तसंच त्याआधी अंबानी कुटुंब प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात पाहायला मिळालं. यावेळी अंबानी कुटुंबाने एकत्र शाही स्नान केलं. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या थोरल्या सूनेच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून अंबानींची थोरली सून श्लोका मेहताचं कौतुक केलं जात आहे.

करीना कपूर-खान आणि सैफ अली खानचा मुलगा जेहची वाढदिवसाची पार्टी नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला श्लोका आपल्या मुलांना वेदा आणि पृथ्वीला घेऊन पोहोचली होती. या पार्टीतून बाहेर पडतानाच्या श्लोकाच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

व्हायरल व्हिडीओमध्ये, श्लोका आपल्या मुलांना घेऊन जेहच्या वाढदिवसाच्या पार्टीतून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळेस दोन्ही मुलं मस्ती करत करत बाहेर पडतात. तेव्हा एकाच्या हातात भेटवस्तू दिसत आहे. ती भेटवस्तू बघण्यासाठी तो त्यावरचा कागद फाडत येत असतो आणि तेव्हाच त्याचा हातातून एक कागदाचा तुकडा खाली पडतो. हाच कागदाचा तुकडा पाहून लगेच श्लोका खाली वागते. तो कागदा तुकडा उचलते आणि स्वतःबरोबर घेऊन जाते. श्लोकाच्या याच कृतीने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

श्लोका मेहताचा हा व्हिडीओवर पाहून एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “क्या बात है. साधेपणा तर बघा.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, हे अंबानी कुटुंबाचे संस्कार आहेत. तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “खूप छान श्लोका जी.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, श्लोका मेहता ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानीची पत्नी आहे. दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. २०१९मध्ये आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर २०२१मध्ये श्लोका पहिल्यांदा आई झाली. तिने एका मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव पृथ्वी आहे. तर २०२३मध्ये श्लोकाला मुलगी झाली; जिचं नाव वेदा आहे.