बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज कुंद्रा विरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राची न्यायालयीन कोठडीतून अद्याप सुटका झालेली नाही. शिवाया या प्रकरणात दररोज नवेनवे खुलासे केले जात आहेत. राज कुंद्राच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनानणी दरम्यान आता मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या जामिनास विरोध दर्शवला आहे.

मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार राज कुंद्राला जामीन मिळाल्यास तो देखील नीरव मोदी आणि मेहुल चोकसी प्रमाणे परदेशात पळ काढण्याची भिती आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तसंच राज कुंद्राच्या व्हाटस्अप चॅटवरून या प्रकरणाचा परदेशातही संबध असल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. शिवाय राज कुंद्राकडे ब्रिटनचं नागरिकत्व असल्याने कोर्टाने राज कुंद्राला जामीन दिल्यास तो परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

हे देखील वाचा: राज कुंद्राच्या अटकेनंतरही शिल्पाची बहीण शमिता शेट्टीची ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये एण्ट्री; म्हणाली…

राज कुंद्रा आणि रयान थोरपे यांनी वकिलांमार्फत याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. अटक करण्याबद्दल कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आल्याचे याचिकेत म्हटलं आहे. त्याचबरोबर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेला रिमांड बेकायदेशीर असल्याचेही म्हटलेलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे देखील वाचा: राज कुंद्रानंतर शिल्पा शेट्टीलाही अटक होणार?; लखनऊ पोलीस मुंबईत दाखल
दरम्यान मुंबई पोलिसांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याचं म्हणत याचिकेला विरोध केलाय. पोलिस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. तसचं राज कुंद्राला जामीन मिळाल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं मत आहे. तसचं राज कुंद्रा ब्रिटनला पळून जाण्याची शक्याता मुंबई पोलिसांनी वर्तवलीय. या प्रकरणी २० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.