Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Wedding: अभिनेत्री सोभिता धुलिपाला आणि तेलुगू अभिनेता नागा चैतन्य यांचा विवाहसोहळा पुढील महिन्यात पार पडणार आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये या जोडीने साखरपुडा करीत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता तेव्हापासूनच या जोडीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. गेल्या महिन्यात (ऑक्टोबर २०२४) या जोडीचे लग्नाआधीचे काही विधी पार पडले आणि या जोडीचे लग्न कसे व कुठे होणार यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्याचे उत्तर चाहत्यांना त्यांच्या व्हायरल झालेल्या लग्नत्रिकेतून मिळाले. हा विवाहसोहळा ४ डिसेंबर २०२४ ला पार पडणार असून, चाहत्यांनाही हा सोहळा पाहता येणार आहे. मात्र, यात एक ट्विस्ट आहे. चाहत्यांना हा लग्नसोहळा पार पडल्यानंतर काही दिवसांनी तो ओटीटी माध्यमावर पाहायला मिळणार आहे.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या माहितीनुसार नागा चैतन्य आणि सोभिता यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या साक्षीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे. हा विवाहसोहळा संपूर्णतया खासगी स्वरूपाचा असणार असल्याने चाहत्यांना पापाराझींच्या कॅमेऱ्यातून विवाहाची झलक पाहता येणार नाही. मात्र, विवाह पार पडल्यानंतर काही दिवसांनी चाहत्यांना हा विवाहसोहळा नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

हेही वाचा…अभिषेक बच्चन बॉलीवूडमधून घेणार होता कायमची निवृत्ती; बिग बींच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे बदलला निर्णय; म्हणाला…

नेटफ्लिक्सने ‘इतके’ कोटी रुपये मोजून विकत घेतले हक्क

नागा चैतन्य आणि सोभिताच्या शाही विवाहसोहळ्याचा आनंद फक्त उपस्थित व्यक्तींनाच नव्हे, तर फॅन्सनाही मिळणार आहे. नेटफ्लिक्सने या विवाहसोहळ्याचे प्रसारण हक्क ५० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. दक्षिण भारतीय सेलिब्रिटी विवाहसोहळ्यांच्या प्रसारण हक्कासाठी मोजली गेलेली आतापर्यंतची ही सर्वाधिक रक्कम मानली जाते. नयनताराच्या लग्नावर आधारित डॉक्युमेंटरीच्या यशानंतर नेटफ्लिक्सने हा मोठा निर्णय घेतला आहे. नागा चैतन्य आणि सोभिता यांचे भारतासह परदेशांमध्येही मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा नेटफ्लिक्सवर आल्यास अनेक चाहते तो पाहू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.

‘हे’ सेलेब्रिटीज लावू शकतात लग्नाला हजेरी

हा विवाहसोहळा खासगी स्वरूपाचा असणार असला तरी जवळपास ३०० मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चिरंजीवी, महेश बाबू, एसएस राजामौली, आमिर खान अमिताभ बच्चन यांसारखे दिग्गज या विवाहसोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…अमिताभ बच्चन जास्त पैसे कमवायला जायचे ‘या’ ठिकाणी, वडिलांनी पत्र लिहून दिला होता ‘हा’ सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४ डिसेंबरला शाही विवाहसोहळा

नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाच्या या शाही विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. पारंपरिक तेलुगू पद्धतीने पार पडणारा हा विवाहसोहळा म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे, असे कळते आहे.