लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. त्यानंतर आता नागराज मंजुळेंच्या नावापुढे आता डॉक्टर हे बिरुद लागणार आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून नागराज मंजुळे यांचा मोठा सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा हनुमंत लोखंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा हनुमंत लोखंडे यांनी नुकतंच फेसबुकवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. नागराज मंजुळे यांनी डॉक्टर पदवी स्विकारतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी म्हटले की, “एम.फिल किंवा SET/NET परीक्षांवर मात करण्यासाठी पुणे विद्यापीठात अंधारलेल्या दिवसात चकरा मारतानाचे तुमचे दिवस आठवतात. तेव्हा मला तुझ्यासाठी हीच इच्छा होती.”

“चार्ली चॅप्लिन म्हणतो, अपयश हे बिनमहत्त्वाचे असते. स्वतःला मूर्ख बनवण्यासाठी धैर्य लागते. तुम्ही अपयशाच्या झळा सोसत होता पण संघर्षापुढे तुम्ही कधीही हार मानली नाही. तुमचा दहावी इयत्ता सोडल्यापासून ते डी.लिटपर्यंतचा एक अविश्वसनीय, स्वप्नवत प्रवास आहे. अनेक प्रतिष्ठित चित्रपटांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांद्वारे सन्मानित झाल्यानंतर आता डी वाय पाटील विद्यापीठाद्वारे तुम्हाला डॉक्टर ऑफ लेटर्स (D. Litt.) ही मानद पदवी प्रदान करण्यात येत आहे. याचा साक्षीदार होणे हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.”

“इतिहासात तुमचे नाव ‘द फेमस फेल्युअर्स’मध्ये आधीपासूनच आहे आणि सन्मानासाठी शिक्षणात एवढी सर्वोच्च पदवी मिळवणे ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. डॉ. नागराज मंजुळे तुम्हाला फार फार शुभेच्छा. तुमच्या स्टडी रूममध्ये लावण्यासाठी एक परिपूर्ण फ्रेम! मित्र-तत्वज्ञ-मार्गदर्शक म्हणून माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,” असे प्रा हनुमंत लोखंडे म्हणाले.

दरम्यान नागराज मंजुळे यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या, फॅंड्री, सैराट आणि झुंड अशा एकाहून एक चित्रपटांची निर्मिती करत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लेखन, दिग्दर्शनासह त्यांनी अनेक चित्रपटांमधून अभिनय देखील केला आहे. त्यांच्या याच योगदानामुळं त्यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून D. Litt ही पदवी बहाल करण्यात आली आहे.

“अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी…”, प्रसिद्ध मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्रीने सिनेसृष्टीला केला कायमचा रामराम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अनेक नवख्या कलाकारांसह निर्मित झालेल्या या चित्रपटाचे दिग्गज कलाकारांनी कौतुक केलं आहे. त्याआधी त्यांनी फँड्री, सैराट हे चित्रपट दिग्दर्शित केले होते. मराठी चित्रपटाच्या इतिहासात १०० कोटींचा टप्पा पार करणारा सैराट हा पहिला चित्रपट ठरला होता. त्याआधी फँड्री सिनेमाची देखील खूप चर्चा झाली होती. फँड्री या चित्रपटासह पिस्तुल्या या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.