प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कुर्रर्रर्र’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या नाटकात विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहे. मात्र आता या नाटकातून नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांनी एक्झिट घेतली आहे. नुकतंच अभिनेत्री विशाखा सुभेदारने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

विशाखा सुभेदारने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ‘कुर्रर्रर्र’ या नाटकाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. या नाटकाचे नवीन पोस्टर तिने शेअर केले आहे. यात प्रियदर्शन जाधव आणि मयुरा रानडे हे दोन नवीन कलाकार पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा : “मला लोक होम-ब्रेकर म्हणतात, पण…”; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रिया बेर्डेंचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या “तेव्हा प्रेमात…”

विशाखा सुभेदारची पोस्ट

“Show must go on.. कलाकारांना उत्तम संधी मिळायलाच हवी..त्यांनी मोठं होणं हा कलेचा वारसा जपण्यासारखं आहे..पण तरीही एखादी कलाकृती तीच नशीब घेवून येते..बाकी आम्ही सगळे निम्मित मात्र.

काही पाखरं भरारी मारायला उडून गेली.. हरकत नाही पण show must go on.. काही प्रिय मित्रांना हाक मारली त्यांनी साथ दिली म्हणून प्रयोग सुरुळीत ठेवता येत आहेत. माझ्या हाकेला धावून आलेला माझा मित्रसखा प्रियदर्शन जाधव.. आणि मैत्रसखी Mayura Ranade…! मित्रानो तुमच्या साथीसाठी आभार आणि नाटकासाठी.., नाटक सुरु राहायला हवं म्हणून त्याची ही धडपड..हे वखाणण्याजोगी आहे. तर मंडळी हाच बदल आहे..

नाटक.. कुर्रर्रर्रर्र कलाकार.. पॅडी कांबळे, प्रियदर्शन जाधव, मयुरा रानडे, विशाखा सुभेदार. आत्तापर्यंत तुम्ही नाटकावर प्रेम केलात त्याबद्दल तुमचे आभार.. पण ह्यापुढे ही कयम सोबत रहा..नाटक बघायला या, आणि बघीयल आवळा तरीही वेगळ्या संचाच नाटक बघायला या..खात्री आहे.. नाटक जगवणाऱ्या कलाकारांचं कौतुक करायला नक्की याल”, असे विशाखा सुभेदारने पोस्ट करत म्हटले आहे.

आणखी वाचा : “एक नवी स्वप्नवत सुरुवात…”, ऋता दुर्गुळेने चाहत्यांना दिली मोठी गुडन्यूज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘कुर्रर्रर्र’ या नाटकाची निर्मिती विशाखा सुभेदारने केली आहे. या नाटकात नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे आणि स्वत: विशाखा सुभेदार हे कलाकार झळकत होते. मात्र आता नम्रता आणि प्रसाद या दोन कलाकारांऐवजी प्रियदर्शन जाधव आणि मयुरा रानडे हे दोन कलाकार पाहायला मिळणार आहेत.