संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. आयुषमान खुराना, तब्बू आणि राधिका आपटे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अंधाधून’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. तर ‘भोंगा’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधून’ या चित्रपटाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगलंच कौतुक झालं होतं. एक डोळस व्यक्ती अंधाच्या नजरेने जग शोधत असताना चित्रविचित्र घटना घडतात आणि चित्रपटाचा शेवट प्रेक्षकाला कोड्यात टाकतो. तर दुसरीकडे ‘भोंगा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केली आहे. ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांच्या खात्यातही काही पुरस्कार आले आहेत. नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाला दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार श्रीनिवास पोकळेला तर पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सुधाकर रेड्डी यांना मिळाला आहे.

मराठी चित्रपट

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- भोंगा

पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)

सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी (नाळ)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ)

 

बॉलिवूडमधील पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपट- अंधाधून

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन-  कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत)

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी

पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो

सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)

सर्वोत्कृष्ट अॅडाप्टेट स्क्रीनप्ले- अंधाधून

 

इतर

सर्वोत्कृष्ट वेशभूषा- तेलुगू चित्रपट ‘महानटी’

सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट- हेलारो

सर्वोत्कृष्ट संवाद- बंगाली चित्रपट ‘तारीख’

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- किर्ती सुरेश (महानटी)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- तेलुगू चित्रपट ‘ऑ’ आणि कन्नड चित्रपट ‘केजीएफ’

सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट- कन्नड चित्रपट ‘केजीएफ’

सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट- हरजीता

सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट- बुलबुल कॅन सिंग

सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट- बारम

सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट- मटानटी

सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- सुदानी फ्रॉम नायजेरिया

सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट- हमिद

सर्वोत्कृष्ट राजस्थानी चित्रपट- टर्टल