बॉलिवूडमधील बेस्ट कपलच्या यादीमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं नाव देखील आता सामिल झालं आहे. रणबीर-आलिया काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले, त्यांचा विवाहसोहळा म्हणजे टॉक ऑफ द टाऊन होता. रणबीर-आलियाच्या लग्नामध्ये दोन्ही कुटुंबामधील मंडळी भलतीच खूश होती. रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रत्येक फोटोंमध्ये अगदी आनंदी दिसत होती.

रणबीर-आलियाच्या लग्नाला काही दिवसच झाले असले तरी नीतू कपूर आपल्या सूनेची अगदी तोंडभरून स्तुती करताना नेहमी दिसतात. आता देखील नीतू यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझींनी नीतू यांना आलियाबाबत प्रश्न विचारला. तुमची सून आलिया कशी आहे? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. “सून…अगदी मस्त” असं नीतू अगदी हसतमुखाने म्हणाल्या.

नीतू यांचं सूनेबाबत असणारं प्रेम, जिव्हाळा या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. रणबीरच्या आईने सूनेबाबत दिलेली प्रतिक्रिया पाहून चाहत्यांनाही सेलिब्रिटी सासू-सूनेच्या जोडीबाबत हेवा वाटला. आलियाचं कपूर कुटुंबामध्ये अगदी जंगी स्वागत झालं असणार हेच यावरून सिद्ध होतं.

आणखी वाचा : आमिर खाननेच केला लेकीचा मेकअप, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया देखील कपूर कुटुंबामध्ये अगदी खूश आहे, ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे कपूर कुटुंबासोबतचे फोटो पोस्ट करताना दिसते. लग्नानंतर रणबीर-आलिया आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत. तर नीतू पहिल्यांदाच एका हिंदी रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदाची धुरा सांभाळताना दिसत आहेत.