Neha Dhupia 21 Days Wellness Challenge to Reduce Inflammation : अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. नेहा धुपिया तिच्या सौंदर्यासाठी अजूनही लक्ष वेधून घेत आहे. तिने २००२ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला आणि २००२ च्या मिस इंडिया युनिव्हर्स स्पर्धेत टॉप १० फायनलिस्टमध्येही स्थान मिळवले.

नेहा चित्रपटांमध्ये कमी आणि रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये जास्त दिसते आणि ती तिचा फिटनेस कायम ठेवते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या वर्कआउट्सचे व्हिडीओ वारंवार शेअर करते. वयाची चाळिशी ओलांडूनही ती तिच्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांना फिटनेस टिप्स दिल्या आहेत. नेहाने तिच्या चाहत्यांना २१ दिवसांचे ‘वेलनेस चॅलेंज’ दिले आहे.

आहारतज्ज्ञ रिचा गंगानी यांनी तिला २१ दिवस दररोज हळद-आले, काळी मिरी व कलौंजी यांचे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. हा काढा प्यायल्याने चयापचय चांगले होऊन, चरबी वेगाने जळू लागते. अशी माहिती अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आहे.

नेहा धुपियाचे ‘वेलनेस चॅलेंज’ काय आहे?

नेहाने एका सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टबरोबर तिच्या चाहत्यांना २१ दिवसांसाठी काढा पिण्याचे आव्हान दिले आहे. या चॅलेंजसह नेहाचा दावा आहे की, २१ दिवस सतत काढा प्ययाल्याने शरीरातील अंतर्गत सूज कमी होईल. नेहाने सांगितले की, ती हे चॅलेंज स्वीकारत आहे. ती म्हणाली, “मी हे चॅलेंज स्वीकारते. माझ्यासाठी हे शरीरातील अंतर्गत सूज कमी करण्यासाठी २१ दिवसांचे चॅलेंज आहे.” या व्हिडीओद्वारे तिने चाहत्यांनादेखील चॅलेंज केलं आहे.

नेहाच्या अनेक चाहत्यांनी विचारले की, हे करण्याचे इतर कोणते फायदे आहेत. अनेकांनी विचारले की, ही रेसिपी कशी तयार केली जाते. दरम्यान, काही चाहत्यांनी अभिनेत्रीचे आव्हान स्वीकारले आहे आणि काढा पिण्यास सुरुवात केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “मी हे दीड वर्षापासून करीत आहे. हे खूप चांगले आहे आणि आपल्या एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.” दुसऱ्याने लिहिले, “मी ते करायला तयार आहे; पण कृपया ते कसे तयार करावे ते सांगा.” तिच्या या व्हिडीओमध्ये नेहाने काढा बनविण्यासाठी लागणारे घटक आणि इतरही माहिती शेअर केली आहे.